व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. आपल्याकडे तर व्हॉट्सअॅप वापरणा-यांची संख्या जास्त आहे. तेव्हा व्हॉट्सअॅप वापरणा-यांसाठी एक धोक्याची सूचना आहे कारण तुमचे अकाऊंट एका फोटोमुळे हॅक होऊ शकते असे चेक पॉईंटच्या अहवालात म्हटले आहे. जे व्हॉट्सअॅप वेबचा वापर करतात म्हणजे कम्प्युटरचा वापर करून अकाऊंट लॉगिन करतात त्या युजर्सचे अकाऊंट हॅक होण्याचा धोका अधिक असतो असे या अहवालात म्हटले आहे. जर एखादी व्यक्ती ठराविक फोटो ओपन करून पाहत आहे तर त्या युजर्ससाठी हे फोटो धोक्याची घंटा ठरू शकते.

वाचा : व्हॉट्सअॅपचे जुने ‘स्टेटस फिचर’ पुढच्या आठवड्यापासून परत येणार

व्हॉट्सअॅपवर आलेले क्यूट किंवा सेक्सी फोटो उघडून पाहण्याची अनेकांना सवय असते पण याच फोटोंच्या माध्यमातून व्हायरस तुमच्या अकाऊंमध्ये शिरू शकतो. त्यामुळे हॅकर तुम्ही पाठवलेले फोटो, चॅट सहज पाहू शकतात. पण जे स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप युज करत असतील त्यांच्यासाठी मात्र याचा धोका कमी आहे. फोटोमध्ये वायरस कोड लपलेले असतात असेही या अहवालात म्हटले आहे एकदा का व्हायरस फोनमध्ये शिरला की कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या अनेकांपर्यंत हॅकर्स व्हायरस पाठवू शकतात, असेही चेक पॉईंटच्या अहवालात म्हटले आहे. टेलिग्राम वापरण्याबाबतही असेच होऊ शकते असा दावा यात केला आहे. पण टेलिग्रामने मात्र हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

Story img Loader