Online Shopping Scam: अलीकडे ऑनलाईन शॉपिंगने वेळ व पैसे वाचवता येतात असा प्रत्येकाचा समज झाला आहे. काही मोठमोठ्या कंपन्यांचे ऑनलाईन सेल या ऑनलाईन शॉपिंगच्या फॅन्सना रोज खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. खरंतर ऑनलाईन खरेदी करणं हा सोयीचा विषय झाला आहे पण जितकी सोय तुमच्या- आमच्या सारख्या ग्राहकांची होते तितकाच गुन्हेगारांसाठी सुद्धा हा फसवणुकीचा सोपा मार्ग ठरत आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये अशाच एका ऑनलाईन डिलिव्हरीमधील स्कॅमची माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हीही वरच्या वर ऑनलाईन पार्सल मागवत असाल तर तुम्हाला हा स्कॅम माहित असणं अत्यंत आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

@thepocketpro_ या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एका तरुणीने आपल्याबरोबर स्कॅम करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले आहे. ऑनलाईन डिलिव्हरी एजंट पार्सल घेऊन आले आहेत आणि त्यांना तुमचं लोकेशन सापडत नाहीये असे सांगत एका व्यक्तीने या तरुणीला कॉल केला होता. त्यानंतर थेट डिलिव्हरी एजंटशी बोलण्यासाठी तिला त्यांनी एक मोबाईल नंबर देऊ केला पण तो डायल करण्याआधी ४०१ हा नंबर डायल करण्यास सांगितले. संशय आल्याने या तरुणीने कॉल करणाऱ्या व्यक्तीला कारण विचारले असता त्यांनी हा नंबर कंपनीचा एक्स्टेंशन नंबर असल्याचं सांगितलं. पण तरीही काहीतरी गडबड आहे असे वाटल्याने तरुणीने फोन ठेवून दिला.

यानंतर तिने ४०१ हा क्रमांक गूगलवर शोधला असता त्यावर हा कॉल फॉरवर्डिंग क्रमांक असल्याचे तिच्या लक्षात आले, म्हणजेच हा क्रमांक डायल केल्यावर तुमच्या नंबरवरील कॉल, महत्त्वाचे मेसेज या नंबरवर फॉरवर्ड होतात. Truecaller सह Jio आणि Airtel सारख्या दूरसंचार ऑपरेटर्सनी या क्रमांकाविषयी ग्राहकांना सूचित केलेले आहे.

हे ही वाचा<< गाझा पट्टीत बॉम्बस्फोटानंतर 5 लहानग्यांना उचलून घेऊन जात होता बाबा? हृदय पिळवटून टाकणारा क्षण, पण…

दरम्यान, तुम्ही सुद्धा अशा घटनांच्या बाबत सतर्क असणे अत्यंत आवश्यक आहे. या व्हिडिओच्या खाली सुद्धा कमेंट्समध्ये अनेकांनी हा प्रकार आपल्याबरोबरही घडल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपणही ऑनलाईन डिलिव्हरी साठी प्रतीक्षा करत असाल तर अशा प्रकारच्या खोट्या कॉलपासून सावध राहायला हवं