बाजारात आजकाल एकापेक्षा एक नवनवीन उपकरणे आली आहेत जे आपले दैनदिन जीवन सुलभ करते. यापैकी एक असे उपकरण आहे जे आजकाल बहुतेक घरामध्ये पाहायला मिळते ते म्हणजे केटल(Kettel). ही केटल पाणी गरम करण्यासाठी सहसा वापरली जाते. चहा, कॉफी आणि इंस्टंट न्युडल्स साठी गरम पाणी हवे असल्यास या केटलचा वापर नेहमी केला जातो. पण केटलची सफाई करणे मात्र तसे अवघड काम आहे. कारण केटलमध्ये इलेक्ट्रिक सरकिट असल्यामुळे त्याला थेट नळाखाली साफ करता येत नाही. केटलची बाहेरील बाजू आपण सहसा थोडे पाणी हातावर घेऊन साफ करू शकतो किंवा कापडाने साफ करतो शकतो पण केटलची आतील बाजू कशी साफ करावी अनेकांना समजत नाही. केटल बरेच दिवस साफ न केल्यास केटलमध्ये एक थर जमा होतो जो आपल्या आरोग्यासाठी समस्या निर्माण करू शकतो म्हणून केटलची व्यवस्थित सफाई करणे आवश्यक आहे. केटल साफ करताना त्याचा आतील तळ साफ करणे जरा अवघड जाते. कारण तो घासण्यासाठी हात आत जात नाही किंवा ब्रशने घासून नीट सफाई देखील होत नाही. काही लोक केटलमध्ये पाणी गरम करतात आणि ते ओतून देतात पण एवढच पुरेसे नाही. म्हणूनच येथे तुम्हाला एका हटके ट्रिक बद्दल सांगणार आहोत. ही ट्रिक वापरून केटल आतून एकदम चकचकीत होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा