Viral Video : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत अनेक शिवभक्त त्यांचे विचारांवर चालतात. त्यांच्याविषयी वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करतात. गडकिल्ल्यांना भेट देऊन त्यांची आराधना करतात. गडकिल्ल्यांचे अनेक व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करतात पण सध्या एक अनोखा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की अवघ्या ७ वर्षांच्या चिमुकलीने शिवरायांच्या चक्क १०८ गडांची पवित्र माती गोळा केली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
चिमुकलीने जमा केली शिवरायांच्या १०८ गडांची पवित्र माती
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हातात गडवा आहे आणि त्यावर हरिश्चंद्रगड लिहिलेय. हा आणि गडवा आलमारीत ठेवताना दिसत आहे. त्या आलमारीत या आधी असे अनेक गडांचे लाव लिहिलेले अनेक गडवे आहेत. अलमारीच्या मध्यभागी शिवरायांची प्रतिमा आहे. घरातील एक भिंत शिवरायांच्या प्रतिमा आणि या गडव्यांनी सजवली आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या गडव्यांमध्ये काय आहे, तर या गडव्यांमध्ये गडाची माती आहे. ज्या गडाची माती आहे, त्या गडाचे नाव त्या त्या गडव्यांवर लिहिलेले आहे. व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार या चिमुकलीने एकूण १०८ गडांची माती गोळा केली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओवर लिहिलेय, “१०८ व्या गडाची माती शिवरायांच्या चरणी विराजमान”
या चिमुकलीचे नाव शर्विका म्हात्रे असून ती अवघ्या सात वर्षांची आहे. तिच्या सोशल मीडियावर गड किल्यांची सैर करतानाचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. शर्विकाने वयाच्या सहाव्या वर्षी १०० गड-किल्ले सर केले होते. तिच्या वयाच्या तुलनेने हा विक्रम खरोखरच खूप मोठा होता. त्यावेळी ती खूप चर्चेत आली होती.
पाहा व्हायरल व्हिडीओ
sharvika_mhatre या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्वप्नांना सीमा नसते….फक्त आपण जी स्वप्न बघतोय ती चिरकाल टिकणारी हवीत…गाडी, बंगला, घर ही स्वप्न तुम्हाला क्षणिक सुख देऊ शकतात पण शिवरायांचे प्रत्येक गड पाहणे, जगणे आणि त्या गडांच्या पायथ्याशी गोळा केलेली ही पवित्र माती आमच्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांना शिवरायांची आणि शंभूराजांची प्रेरणा देणारी आहे ..स्वप्न एकच स्वराज्यातील सर्व गडकिल्ले सर करणे….”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “साक्षात सह्याद्रीची वाघीण” तर एका युजरने लिहिलेय, “कौतुक करावे तितके कमीच” आणखी एका युजरने लिहिलेय, “ध्येयवेडी मराठी मुलगी शर्विकाला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे अजूनही बरेच गड किल्ले पाहण्यासाठी भवानी मातेचे असेच आशीर्वाद मिळत राहो.” हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी या चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.