आईची माया सर्वांना दिसते पणा वडीलांच प्रेम मात्र कोणाला दिसत नाही. आई प्रमाणेच वडीलही लेकराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असतात याची जाणीव अनेकदा मुलांना नसते. आपलं चुकल्यावर ओरडणारे वडील आपल्याला कडक शिस्तीचे वाटतात पण त्यामुळेच आपल्यावर चांगले संस्कार होतात. एखादी गोष्ट करण्यासाठी नकार दिला तर आपल्याला समजून घेत नाही असे वाटते पण त्यामागे त्यांच्या मनात आपली असलेली काळजी मात्र दिसत नाही. वडील आपल्याला समजून घेत नाही म्हणणे खूप सोपे आहे, पण कधी आपल्या वडीलांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? नसेल तर हा प्रयत्न एकदा नक्की करा. वडीलांच प्रेम हे नारळासारखं असते. नाराळाचं बाहेरील आवरणं जसं कडक असते तसेच वडील मुलांबरोबर कडक शिस्तीने वागतात. पण जसा नारळाच्या आत गोड मलई आणि पाणी असते त्याचप्रमाणे वडीलांच्या मनात लेकरांसाठी अपार प्रेम असतं ज्याची कोणी कल्पनाही केली केली नसेल. आपल्या लेकरांना कसला त्रास होऊ नये म्हणून त स्वत: त्रास सहन करतात. आपल्या गरजा पूर्ण करण्याआधी मुलांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी प्राधान्य देतात. मुलांना या गोष्टीची जाणीव नसते. वडील आणि मुलाचं हेच नातं दर्शवणार एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – ‘बाप खरा पाठीराखा!’ लेकाचा अभिनय पाहून वडीलांच्या डोळ्यात आलं पाणी, आनंदाने वाजवल्या टाळया; पाहा Viral Video

Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”
Dance Viral Video
‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ…’, गाण्यावर चिमुकलीने…
Arvind kejriwal dr babasaheb ambedkars Fact Check marathi
अरविंद केजरीवालांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेले ‘ते’ आक्षेपार्ह विधान खरंच तसे आहे का? वाचा, VIRAL VIDEO ची खरी बाजू….
Seema haider pregnant husband Sachin reacted after she gave pregnancy news video viral on social media
पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर आता पाचव्यांदा होणार आई, सोशल मीडियावर VIDEO शेअर करत दिली गुड न्यूज, पण सचिन म्हणाला…
pune video
हे काय चाललंय पुण्यात! बेशिस्तपणाचा कळस; थेट फुटपाथवरून चालवताहेत गाड्या, VIDEO होतोय व्हायरल
Video a brother cried for a bride sister on a wedding day
या दिवशी प्रत्येक भाऊ रडतो! बहिणीजवळ ढसा ढसा रडला; VIDEO पाहून व्हाल भावुक
Shocking video delhi two girls fight in college video viral on social media
“अगं सोड जीव जाईल तिचा”, भर कॉलेजमध्ये तरुणींमध्ये कपडे फाटेपर्यंत हाणामारी; VIDEO पाहून धक्का बसेल
emotional video of Husband wife supporting each other in bad phase viral video on social media
साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
A Pakistani girl who never went to school speaks 6 languages
Video : कधी शाळेत गेली नाही पण बोलते तब्बल ६ भाषा; ‘या’ पाकिस्तानी मुलीची एकच चर्चा, व्हिडीओ एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक व्यक्ती सायकल चालवताना दिसतो. जस जसा व्हिडीओ पुढे जातो. तसे लक्षात येते की हा व्यक्ती एका हाताने सायकल चालवत आहे आणि दुसऱ्या हातात त्याने एका लहान मुल पकडले आहे. आपल्या लेकराला खांद्यावर घेऊन हा व्यक्ती सायकल चालवत आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले आहे. व्हिडीओ पाहून लोकांच्या मनात एकच विचार येईल की, हे फक्त एक बापचं करू शकतो.

हेही वाचा – ‘वडा पाव गर्ल’च्या चाहत्याने हातावर कोरला तिचा टॅटू, नेटकऱ्यांनी केले ट्रोल, पाहा Viral Video

इंस्टाग्रामवर ‘lay_bhari_official’ वर नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना “बापाच्या सावलीतचं जीवन आकार घेत असतं”असे कॅप्शन दिले आहे. एखाद्या झाडाच्या सावलीत जशी अंख्य पाखरे आनंदाने राहतात तसेच वडील आपल्या लेकरांना त्यांच्या सावलीत ठेवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक मुलाला वडीलांच्या या प्रेमाची जाण असली पाहिजे.

Story img Loader