आईची माया सर्वांना दिसते पणा वडीलांच प्रेम मात्र कोणाला दिसत नाही. आई प्रमाणेच वडीलही लेकराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असतात याची जाणीव अनेकदा मुलांना नसते. आपलं चुकल्यावर ओरडणारे वडील आपल्याला कडक शिस्तीचे वाटतात पण त्यामुळेच आपल्यावर चांगले संस्कार होतात. एखादी गोष्ट करण्यासाठी नकार दिला तर आपल्याला समजून घेत नाही असे वाटते पण त्यामागे त्यांच्या मनात आपली असलेली काळजी मात्र दिसत नाही. वडील आपल्याला समजून घेत नाही म्हणणे खूप सोपे आहे, पण कधी आपल्या वडीलांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? नसेल तर हा प्रयत्न एकदा नक्की करा. वडीलांच प्रेम हे नारळासारखं असते. नाराळाचं बाहेरील आवरणं जसं कडक असते तसेच वडील मुलांबरोबर कडक शिस्तीने वागतात. पण जसा नारळाच्या आत गोड मलई आणि पाणी असते त्याचप्रमाणे वडीलांच्या मनात लेकरांसाठी अपार प्रेम असतं ज्याची कोणी कल्पनाही केली केली नसेल. आपल्या लेकरांना कसला त्रास होऊ नये म्हणून त स्वत: त्रास सहन करतात. आपल्या गरजा पूर्ण करण्याआधी मुलांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी प्राधान्य देतात. मुलांना या गोष्टीची जाणीव नसते. वडील आणि मुलाचं हेच नातं दर्शवणार एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा