Mumbai Local Train Viral Video : आलिशान हॉटेल्स, बहुमजली इमारती, झोपडपट्ट्या, झोपडपट्ट्यांनी खचाखच भरलेली महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची गर्दी इतर शहरातील गर्दीपेक्षा वेगळी आहे. या गर्दीत प्रत्येक व्यक्ती एकटा आणि स्वतंत्र दिसतो. इथे सोबत चालणारी माणसं पुढच्या क्षणी एकटे राहण्याची सहज तयारी करून भेटतात.त्यात लोकल ट्रेन तर कधीच रिकामी दिसणार नाही. मुंबईची लाईफलाईन म्हणून मंबई लोकल ट्रेनला ओळखलं जाते. दररोज या लोकल ट्रेनने लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या शहरात काम करण्यासाठी येतात.
मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. या मुंबई लोकलची गर्दी हीच तिची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ फक्त मुंबईकरांनाच कळेल. असा काय आहे हा व्हिडीओ पाहूयात
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका छोट्याशा टबमध्ये कुत्र्याची पिल्ल बारी बारीनं येऊन बसत आहेत. एका छोट्याश्या टबमध्ये अगदी थोडीच जागा आहे, मात्र तरीही ते अडजेस्ट होत जवळजवळ ६ पिल्लं बसली. तुम्ही जर खरंच मुंबईकर असाल आणि रोज लोकलने प्रवास करता तर हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्हाला लोकल ट्रेनच्या गर्दीची आठवण होईल. मुंबई लोकलमध्येही अशीच गर्दी असते जागा कमी असते, मात्र बोहोत जगाह है अंदर चलो अंदर म्हणत मुंबईकर एकमेकांना अॅडजस्ट करुन घेतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Online Wedding: मुसळधार पावसामुळे जोडप्याने केले चक्क ऑनलाइन लग्न; व्हिडीओ व्हायरल
मुंबई लोकलमधून रोज ८० लाख प्रवासी प्रवास करतात. यात ४५ लाख मध्य रेल्वेचे प्रवासी आहेत. सकाळी गर्दीच्या वेळी जलद आणि धीम्या लोकल मिळून सुमारे ९०हून अधिक लोकल धावतात. लटकणाऱ्या प्रवाशांसह आसनक्षमतेचा विचार केल्यास एका लोकलमधून अंदाजे पाच हजार प्रवासी प्रवास करतात. याचा अर्थ चार तासांत साडेचार लाख प्रवासी प्रवास करतात.