पुणे तिथे काय उणे! ही म्हण अगदी खरी आहे कारण पुण्यात अशी कोणतही गोष्ट नाही जी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पुण्यात एकापेक्षा एक हटके व्यक्तीमत्त्वाचे पैलु दर्शवणारे पुणेकर भेटतात जे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. खरं तर पुणेकरांची पुणेरी शैली ही हजरजबाबीपणा, स्पष्टवक्तेपणा आणि उपाहात्समक टोला लगावणारी आहे. खरे पुणेकर तसे शिस्त प्रिय आहे त्यामुळे जेव्हाही कोणत्या नियमांचे उल्लंघन होते तेव्हा पुणेकर पुणेरी शैलीत इतरांना उत्तर देण्यास मागे पुढे पाहात नाही. पुणेकरांची हीच पुणेरी शैली नेहमी चर्चेचा विषय ठरते.
सध्या अशाच एका पुणेकराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पुणेकरांची प्रत्येक गोष्ट करण्याची स्वत:ची एक पद्धत आहे जी नेहमीच इतरांपेक्षा हटके असते. पुण्यातील वाहतूक कोंडीची चर्चा आता जागतिक पातळीवर पोहचली आहे. वाहतूक कोंडीमुळे पुणेकर आधीपासून वैतागले आहे त्यात अनेकदा लोक वाहतूक कोंडीत अडकले असताना विनाकारण जोरजोरात हॉर्न वाजवतात. या हॉर्नच्या आवाजाला कंटाळलेल्या पुणेकाराने त्यावर हटके पर्याय शोधून काढला आहे.
सध्या पुण्यातील दुचाकी चालकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो चक्क हातात घंटी घेऊन दुचाकी चालवत आहे. हॉर्नऐवजी तो हातातील घंटी वाजवताना दिसत आहे. हॉर्नच्या कर्कश आवाजाने कंटाळलेल्या पुणेकरांना जो हटके जुगाड शोधला आहे ते पाहून नेटकरी देखील चक्रावले आहे.
व्हिडीओ इंस्टाग्रामवर punekar2.0_og नावाच्या अकाऊंटवरील आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये”पुणेकर” असे लिहिले आहे.
व्हिडीओवर एकाने कमेंट केली की,” नाद करायचा नाही पुणेकरांचा! समजलं का? आम्ही पुणेकर!”
दुसऱ्याने कमेंट केली की, का पण! उगाच!
तिसऱ्याने कमेंट केली की, “हे फक्त पुणेकर करू शकतो!”
चौथा म्हणाला, “पुणे तिथे काय उणे”
पाचवा म्हणाला की, “कुल्फीवाले” (कुल्फी विक्रेत्यांप्रमाणे घंटी वाजवत आहे.)