शाळेतील दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असतात, हे दिवस फक्त मित्र-मैत्रिणी आणि शाळेतील आठवणींमुळे नाही तर शिक्षकांमुळेही अविस्मरणीय असतात. कारण आई-वडीलांनंतर शिक्षक असतात जे आपल्या बालमनावर योग्य संस्कार करतात आणि आपल्याला घडवतात. छान छान गोष्टीतून आणि कविता किंवा गाण्यातून आपल्याला काय चुकीचे किंवा काय बरोबर हे आपल्याला सांगतात. लहानपणी शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी आपल्या मनावर कायमच्या बिंबवल्या जातात आणि त्या आयुष्यात आपल्याला योग्य मार्ग निवडण्यासाठी मदत करतात. असे शिक्षक आपल्याला शिकवत होते हे आपल्या पिढीसाठी भाग्याची गोष्ट होती. आजच्या काळात असे शिक्षक फार मोजकेच असतात जे विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट शिकवण्यासाठी काहीतरी हटके प्रयोग करतात. अशाच काही शिक्षकांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.
सोशल मीडियावर एका जिल्हा परिषेदेच्या शाळेतील शिक्षकांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. साक्षरतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिक्षकांनी हटके पद्धत वापरली आहे. साक्षरतेबाबत जागरुकता करण्यासाठी शिक्षकांनी साक्षरता गीत लिहिले आहे. या साक्षरता गीताला प्रसिद्ध गाणे “जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला” या गाण्याची चाल लावली आहे. एवढंच नाही तर हे गाणे गायले देखील आहे आणि त्यावर नृत्यही केले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये शिक्षक साक्षरता गीतावर थिरकताना दिसत आहे. शिक्षकांनी गीतावर ठेका धरला आहे.
साक्षरता गीताचे बोल
“आवड मला लिहायची, मी लिहायला लागलो,
आवड मला वाचायची, मी वाचायला शिकलो,
शेजारची ती अडाणी मैना लागली वाचायला अन् लागली लिहायला
जेव्हा साक्षरता लागला कार्यक्रम लागला गावात राबवायला”
शिक्षकांचा डान्स सर्व विद्यार्थी आणि शिक्षक पाहात आहे. व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडिओ infowari या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कसं वाटलं मग साक्षरता गीत”
व्हायरल व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी शिक्षकांचे कौतुक केले आहे.
एकाने कमेंट केली, खूप छान, शिक्षक हा सर्वगुण संपन्न पाहिजे”
दुसऱ्याने कमेंट केली की, “सर खूप छान डान्स आहे, खूप छान साक्षरतेची गरज आहे. आताच्या पिढीला पण मोबाईल सुटेल तर ना!”
तिसऱ्याने लिहिले की,”मस्तचं खूप लहान. व्हिडिओ वाटला अजून पाहावा असे वाटते. खूप मस्त डान्स आणि गाणे पण छान रचलं”
चौथा म्हणाला की,”शब्द सुचत नाहीये एवढं भारी”
पाचवा म्हणाला की, हे फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक करू शकतात.