Viral video: शिक्षण हा प्रत्येकाचा वारसा आहे जो देशातील प्रत्येक व्यक्तीला जीवनात मोठी उंची देतो. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाचा विकास शक्य नाही आणि देशाची अर्थव्यवस्थाही प्रगती करू शकत नाही. शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. मात्र काही मुलांना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही, लहानपणापासूनच जर पालकांनी शिक्षकांनी मुलांना त्यांच्या भाषेत समजावून शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले तर त्यांना जाणीव होते. वाढत्या वयात मुलांवर योग्य संस्कार केले नाहीत, तर मग पुढे मुलांवर बहुतांशी वाईट संगतीचा विपरीत परिणाम होतो. मुलांनी चांगलं वागावं, कधीच कोणाचा अपमान करू नये, त्यांना चांगलं काय, वाईट काय यातील फरक कळावा, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मात्र, हीच मुलं जर चुकीच्या वळणाला गेली, तर आई-वडिलांनी आयुष्यभर केलेल्या कष्टाची राखरांगोळी झाल्यासारखी त्यांची स्थिती होते. म्हणूनच मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार होणं गरजेचं आहे.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये शिक्षणामुळे आपल्या आयुष्यात किती मोठा बदल घडू शकतो आणि तेच न शिकल्यामुळे कशी वेळ येऊ शकते हे समोर आलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा