Viral video: शिक्षणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. शिक्षण हा प्रत्येकाचा वारसा आहे जो देशातील प्रत्येक व्यक्तीला जीवनात मोठी उंची देतो. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाचा विकास शक्य नाही आणि देशाची अर्थव्यवस्थाही प्रगती करू शकत नाही. शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. मात्र काही मुलांना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही, लहानपणापासूनच जर पालकांनी शिक्षकांनी मुलांना त्यांच्या भाषेत समजावून शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले तर त्यांना जाणीव होते. वाढत्या वयात मुलांवर योग्य संस्कार केले नाहीत, तर मग पुढे मुलांवर बहुतांशी वाईट संगतीचा विपरीत परिणाम होतो. मात्र परिस्थितीमुळे काही पालकांना आपल्या मुलांना शिक्षणही देता येत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन वेगवेगळं चित्र पाहायला मिळालं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही जर तुमच्या परिस्थितीवर नाराज असाल तर तुम्हालाही यातून धडा मिळेल. तसेच हा व्हिडीओ प्रत्येक वयात येणाऱ्या मुलांना दाखवला पाहिजे. अक्षरश: वास्तव दाखवणारा हा व्हिडीओ असून पाहून खरंच आयुष्य बदलेलं.

माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच आपल्या गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. त्याची ही धडपड आणि काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती पाहू नेटकरी तोंडभरुन कौतुक करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका शाळेच्या बाहेर बांधकाम सुरु आहे यावेळी त्याठिकाणी एक चिमुकला विटा घेऊन जात आहे तर दुसरीकडे त्याच्याच वयाची मुलं शाळेत जात आहे. एकाच व्हिडीओमध्ये दोन चित्र पाहायला मिळत आहे. एकाला इच्छ असून शाळेत जाता येत नाहीये तर शाळेत जाणारी मुलं आपल्यालाही असं बाहेर राहता आलं असतं तर असा विचार करत असतील. मात्र शिक्षणाच्या फरकामुळेच त्या चिमुकल्याला आज शिक्षण घेता येत नाहीये, त्यामुळे जी मुलं शिक्षणाकडे लक्ष देत नाहीत अशा वयात येणाऱ्या प्रत्येक मुलाला हा व्हिडीओ दाखवला पाहिजे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>याला काय म्हणाल नशीब की चमत्कार? ८ वेळा पलटली SUV कार; समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा

आयुष्य हे फक्त आनंदी राहणे, हसणे किंवा मजा-मस्ती करण्यापुरते मर्यादित नसते. आयुष्यात कधी कधी थोडे दुःख संघर्ष आणि भरपूर कष्ट सहन करावे लागतात. कोणाची आर्थिक परिस्थिती चांगली असते तर कोणाची नसते. ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला खूप काही शिकवते. जी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला सामोरी जाते तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने घडते. परिस्थिती व्यक्तीला जगायला शिकवते. सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only difference is education toddlers struggle to help family a video that every father should show to his coming of age children video goes viral srk