Jugaad Viral Video : सध्या या डिजिटल जगात सर्व काही ऑनलाईन झाले आहे. कोणतीही गोष्ट घरबसल्या तुम्ही खरेदी करू शकता. पूर्वी एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता. बालपणी जर एखाद्या गोष्टीची गरज भासली तर तेव्हा आई बाबा जुगाड करून त्या परिस्थितीत ती समस्या सोडवायचे. सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण येईल. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की ऐन वेळी आई मुलासाठी अनोखा जुगाड करताना दिसते.
असा जुगाड भारतीय आईच करू शकते!
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आई दिसेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की शाळेत जाताना चिमुकल्याचा एक मोजा दिसत नाही तेव्हा आई जे काही करते, ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आईचा जुगाड पाहून कोणीही अवाक् होईल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आई चिमुकल्याला एका पायात मोजा घालते आणि दुसर्या पायात आई मुलाच्या पायावर मोज्याचा रंग म्हणजेच काळा रंग लावते. हा काळा रंग म्हणजेच ती कढईची काळी पोत लावते आणि मोजा तयार करते त्यानंतर ती मुलाच्या पायात शूज घालते त्यानंतर मुलगा शाळेत जातो. आईचा हा अनोखा जुगाड ऐकून कोणीही थक्क होईल.
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे जुगाड व्हायरल होतात. एखाद्या वस्तूचा ऐन वेळी कसा पुन्हा उपयोग करायचा आणि वापरत नसलेली वस्तू कशी उपयोगात आणायची, यालाच जुगाड म्हणतात. असं म्हणतात, भारतात लोक सर्वात जास्त जुगाड करतात. काही जुगाड खूप क्रिएटिव्ह असतात तर काही जुगाड अवाक् करणारे असतात.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
salony या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीो शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भारतीय आया सर्वात जास्त जुगाडू असतात”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भारतातील आईची वेगळी गोष्ट असते” तर एक युजर लिहिते, “जुगाडमध्ये भारतीय आई अव्वल आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “यापेक्षा मोठा जुगाड कोणताही नाही” एक युजर लिहितो, “जुगाडमध्ये भारतीय अव्वल असतात.”