Viral Video : असं म्हणतात आई ही आई असते. आईची जागा आपल्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही. आई इतके प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी कोणीही करत आहे. त्यामुळे आईची तुलना ही देवाबरोबर केली जाते. मुलांचे चांगले व्हावे, यासाठी ती सतत प्रयत्न करते. अनेकदा ती तिच्या पद्धतीने मुलांना समजून सांगण्याचा प्रयत्न करते. कधी लहान मुले ऐकत नाही तेव्हा ती तिच्या अनोख्या पद्धतीने मुलांना पटवून सांगते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये औषध प्यायला न आवडणाऱ्या एका चिमुकलीला तिची आई मोठ्या हुशारीने औषध पाजताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल आणि तुम्हाला हसू आवरणार नाही.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकली दिसेल. या व्हिडीओत तुम्हाला चिमुकलीची आई दिसेल. या दोघीही टरबूजमध्ये स्ट्रॉ टाकून टरबूजमधील रस पिताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की की टरबूजमध्ये औषधचा छोटा कप ठेवला आहे आणि ही चिमुकली टरबूजचा रस नाही तर औषध पित आहे. विशेष म्हणजे या चिमुकलीला माहीत नाही की ती टरबूजचा रस नाही तर औषध पीत आहे. तिला कदाचित औषध प्यायला आवडत नसावे म्हणून आई हुशारीने तिला औषध पाजताना दिसत आहे. आईसुद्धा तिच्याबरोबर टरबूजचा रस पीत असल्याची नक्कल करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
alluchu_aadhya या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भारतीय आईचे टॅलेंट” तर एका युजरने लिहिलेय, “ही भन्नाट आयडिया दिल्याबद्दल धन्यवाद” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे फक्त एक आईच करू शकते.” एक युजर लिहितो, “तुम्हाला अशा आयडिया कशा सुचतात पण हे माझ्या मुलांबरोबर करणे अशक्य आहे.” अनेक युजर्सनी आईचे कौतुक केले आहेत. काही युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.