मे महिन्याच्या कडक उन्हामुळे सध्या वीजेची मागणी वाढली आहे. देशभरात सूर्य आग ओकत असल्याने लोक घरात पंखा, एसी, कुलर लावून स्वतःला थंड करून घेत आहेत. परिणामी वीजबिलांची रक्कम वाढत आहे. वीजबिले पाहून अनेकांना घाम फुटतोय. पण समजा एका झोपडपट्टीत राहणाऱ्या बाईला जिच्या घरात फक्त एक बल्ब आहे, तिला १ लाखांचं वीजबिल आलं तर? तुम्हाला ही अतिशोयक्ती वाटेल, पण खरंच, फक्त बल्ब हे इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरणाऱ्या महिलेल तब्बल १ लाखांचं बिल आलं आहे. हे बिल पाहून त्या ९० वर्षीय वृद्धेला शॉकच बसलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटकातील कोप्पल तालुक्यातील भाग्यनगर येथे एका झोपडी वजा शेडमध्ये एका ९० वर्षीय महिला राहते. गिरिजम्माला असं या वृद्धेचं नाव. तिच्या घरात फक्त एक बल्ब आहे. त्यामुळे तिचं नियमित वीजबिल फक्त ७० ते ८० रुपये येतं. परंतु, मे महिन्यात तिला १ लाख ३ हजार ३१५ रुपये बिल आलं. बिलावरची ही रक्कम पाहूनच तिला शॉक बसला. एका बल्बचे एवढं वीजबिल पाहून तिने थेट वीज पुरवणाऱ्या गुलबर्गा वीज पुरवठा कंपनीचं (गेस्कॉम) कार्यालय गाठलं. तसंच ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. तिने हे वीजबिल कमी करून देण्याची मागणी कंपनीकडे केली. नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी कंपनीचे अधिकारी घरी आले. त्यांनी वृद्धेचा मीटर तपासला. त्यावेळी मीटर रीडिंगच्या त्रुटीमुळे जास्तीचं बिल आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

महत्त्वाचं म्हणजे, हे प्रकरण तेथील ऊर्जामंत्री के.जे. जॉर्ज यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं. त्यामुळे त्यांनी वृद्धेला बील न भरण्याचं आवाहन केलं आहे. मीटरचे रीडिंग घेताना चूक झाल्याने हे वाढीव बिल आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, तेव्हा या वृद्ध महिलेने सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, असे प्रकार देशभर सर्वत्र पाहायला मिळतात.