रोजच्या दैनंदिन कामकाजामुळे तुम्हाला कदाचित थकवा जाणवत असेल, परंतु, आता एका व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोने सर्वांच्याच झोपा उडवल्या आहेत. अशा प्रकारचे लोकांच्या मेंदूला चालना देणारे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण काही फोटो इतके अवघड असतात की त्यांना समजणं खूप कठीण वाटतं. पण या फोटोतील ऑप्टिकल इल्यूजन खूप वेगळा आहे. या फोटोत सुर्यास्त होत असल्याचं चित्र दिसत आहे आणि यामध्ये एक जिराफ लपलेला आहे. त्याला शोधण्यात अनेकांना अपयश आलं आहे. कारण ज्यांच्याकडे तल्लख बुद्धी आहे आणि गरुडासारखी नजर आहे, तीच माणसं या फोटोत लपलेला जिराफ शोधू शकतात.
या फोटोची मजेशीर गोष्ट अशी आहे की, जिराफ स्पष्ट दिसत नाहीय. फोटोत दिसतंय की, झाडांच्या आजुबाजूला आकाशात ढग जमा झाल्याचे दिसत आहे. या सूर्याचं लालभडक दृष्य या फोटोत पाहायला मिळत आहे आणि सूर्य दिसेनासा होत असल्याचं दिसत आहे. या सर्वांमध्ये जिराफ नेमका कुठे लपला आहे, याचा अंदाज लावता येत नाहीय. फक्त ज्यांच्याकडे तीक्ष्ण नजर आहे, तेच या फोटोत लपलेला जिराफ शोधू शकतात. कारण हा एक ऑप्टिकल इल्यूजनचा असा फोटो आहे. ज्यामुळे लोकांना विचार करण्यास भाग पडलं आहे. थोड्या वेळेसाठी लोकांना आव्हान देणं हेच या फोटोची खासीयत आहे.
या फोटोत जिराफ एका झाडाच्या बाजूलाच उभा आहे आणि त्याची मान या फोटोत दिसत आहे. जर तुम्ही बारकाईने या फोटोकडे पाहिलं तर, तुम्हाला फोटोच्या मध्यभागी असलेलं झाड आणि सूर्याच्यामध्ये जी आकृती दिसते तोच जिराफ आहे. जिराफला या फोटोत असं सेट करण्यात आलं आहे की, जसंकी तो दिसणारच नाही. पण तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला जिराफ नक्कीच दिसेल.