रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने जगभरात तणावाचं वातावरण आहे. इतर देश युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर, रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणावरून रशिया टीकेचा धनी ठरत आहे. अनेक देश युक्रेनला पाठिंबा देताना दिसून येत आहेत. तर युक्रेनियन नागरिक देखील जीवाची पर्वा न करता रशियन लष्कराला विरोध करत आहेत. याच दरम्यान, एका अॅडल्ट मॉडेलने रशियन सैनिकांना विचित्र ऑफर दिली आहे.
Ukraine War: मोठी बातमी! युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
या मॉडेलने रशियन सैनिकांना एक विचित्र ऑफर दिली आहे. जर रशियन सैनिकांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आदेश धुडकावून लावले, तर ती असं करणाऱ्या सैनिकासोबत रोमान्स करेल, असं तिनं म्हटलंय. ट्विटरवर बॅड किट्टी नावाने प्रसिद्ध असलेली मॉडेल लिली समर्स सध्या तिच्या या विधानामुळे चर्चेत आहे.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, जेव्हापासून रशिया आणि युक्रेनमध्ये वाद सुरू झाला तेव्हापासून ती ट्विटरवर वादग्रस्त ट्विट करत आहे. ती युक्रेनला पाठिंबा देत असल्याचं तिच्या पोस्टवरून कळतंय. युक्रेनने युद्ध जिंकावं, यासाठी आता ती रशियन सैन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्सही देत आहे.
Russia-Ukrane War: “तिसरे महायुद्ध विनाशकारी असेल, आम्ही युक्रेनला अण्वस्त्रे…”; रशियाचा गंभीर इशारा
नुकतीच तिने रशियन लष्कराला एक धक्कादायक ऑफर दिली आहे. तिने लिहिले की, जे सैनिक पुतिन यांच्या आदेशांचं पालन करणार नाहीत, अशा रशियन सैनिकांसोबत ती रोमान्स करेल. यासोबतच तिने युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची मागणीही केली आहे. तिने २७ फेब्रुवारीला केलेल्या ट्विटमध्ये युक्रेनच्या सैनिकांनाही एक ऑफर दिली आहे.
VIDEO: रशियन सैन्याला थांबवण्यासाठी तो टँकवर चढला, पण लष्करानं घेरलं अन्…..
युक्रेनच्या सैनिकांसाठी तिने ऑफर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते की, जो सैनिक एका रशियन सैनिकाला मारेल, त्याला ती न्यूड फोटो पाठवेल, जो कोणी एक रशियन टँक नष्ट करेल त्याला ती एक व्हिडीओ पाठवेल आणि जो कोणी रशियाचं एक विमान पाडेल, त्याच्यासोबत ती एक रात्र रोमान्स करेल. ही मॉडेल सध्या तिच्या या विचित्र ऑफरमुळे चांगलीच चर्चेत आहे.