Top Trending Cars : ऑटोमोबाइल उद्योग हा देशातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे आणि दिवसेंदिवस हे क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. या क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींविषयी लोक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. गेल्या आठवड्याभरात ऑटोमोबाइल क्षेत्रातील कोणत्या घडामोडींनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि कोणत्या गोष्टी लोकप्रिय ठरल्या, गूगल ट्रेंडवर याबाबतची आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या सात दिवसांमध्ये, हिंदुस्थान ॲम्बेसेडर कार, मारुती कंपनी, स्कोडा कंपनी, बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीची ऑटोमोबाइल क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली. याशिवाय भारतातील होसूर हे शहर टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमुळे चर्चेत आले. आज आपण ऑटोमोबाइल क्षेत्रातील या टॉप ट्रेंडिंग विषयांबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

Top Trending Auto Vehicle in Google trending
(Photo : Google Trends)

हिंदुस्थान ॲम्बेसेडर कार मॉडेल

सध्या लोक गूगलवर हिंदुस्थान ॲम्बेसेडर कार मॉडेल सर्वात जास्त सर्च करत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिंदुस्थान ॲम्बेसेडर ही जुनी कार आता का लोक सर्च करताहेत? हिंदुस्थान ॲम्बेसेडर ही भारतातील सर्वात लोकप्रिय कारपैकी एक आहे. १९५८ मध्ये ही कार लाँच करण्यात आली. ही कार सरकारी अधिकारीसुद्धा वापरायचे. देशातील अनेक शहरांमध्ये टॅक्सी म्हणूनही या कारचा वापर केला जात होता.
सध्या ईव्ही कारमुळे ऑटो क्षेत्रात बरीच प्रगती झाली आहे. हिंदुस्थान ॲम्बेसेडरचे नवे ईव्ही मॉडेल येणार असल्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. कारण दिलीप छाबडिया यांनी हिंदुस्थान ॲम्बेसेडरच्या नव्या ईव्ही मॉडेलची संकल्पना मांडली आहे. दिलीप छाबडिया हे एक कार डिझाइनर आहेत, ते स्पोर्टी आणि लाइफस्टाइल कार तसेच बस डिझाइन करतात आणि त्यांच्या डिझाइनचे सर्वत्र कौतुक केले जाते.

Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत
Car is going viral on social media because of the quotes written on its back funny photo goes viral
PHOTO: पठ्ठ्याचा प्रामाणिकपणा! कारच्या मागे लिहलं असं काही की…वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल

या कारला उत्तम प्रतिसाद मिळाला तर त्याचे उत्पादन केले जाऊ शकते. पण, ही डिझाइन कंपनीने केलेली आहे. कार प्रत्यक्षात उत्पादनात उतरेल की नाही याबाबत कोणतीही बातमी समोर आलेली नाही.

होसूर

सध्या भारतातील होसूर या शहराची चांगलीच चर्चा सुरू आहे. तमिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील होसूर हे शहर येथील टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला शनिवारी पहाटे भीषण आग लागल्यामुळे चर्चेत आले. या आगीमुळे या प्लांटचे मोठे नुकसान झाले, पण सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ही टाटा कंपनी आयफोनचे पार्ट बनवते.

मारुती

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी त्याच्या नवीन मॉडेलमुळे सतत चर्चेत येते. मारुती सुझुकी लवकरच थर्ड जनरेशन लाँच करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आता दिवाळीनंतर ४ नोव्हेंबरला मारुती सुझुकीची कार अधिकृतरित्या लाँच केली जाऊ शकते. मारुती सुझुकी ही आधीच तिच्या मायलेजसाठी ओळखली जाते, त्यामुळे कंपनीचे प्रत्येक मॉडेल ग्राहकांच्या पसंतीस उतरते.

स्कोडा

स्कोडा इंडिया कंपनी सध्या ट्रेंडिंगवर आहे. कारण स्कोडा कंपनी आता लवकरच ग्राहकांसाठी एक नवीन सब कॉम्पॅक्ट SUV Kylaq लाँच करणार आहे. ही कार येत्या ६ नोव्हेंबर रोजी भारतात लाँच होणार असून याच्या फीचर्सची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. स्कोडा कंपनीची ही SUV कार Maruti Suzuki Brezza, Mahindra XUV 3XO , Tata Nexon आणि Hyundai Venue सारख्या तगड्या मॉडेल्सना टक्कर देऊ शकते.

बजाज हाऊसिंग फायनान्स

सप्टेंबर महिन्यात बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनी आयपीओमुळे सर्वाधिक चर्चेत राहिली. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ १६ सप्टेंबर रोजी ११४ टक्क्यांच्या प्रीमियमवर शेअर बाजारात लिस्ट झाला. एका लॉटमध्ये २१४ शेअर होते. प्रत्येक शेअरची किंमत ६०-७० दरम्यान निश्चित करण्यात आली होती. गुंतवणूक करणाऱ्यांना प्रत्येक शेअरवर ८० रुपयांची कमाई करता आली.