ऑपरेशन RTG : अनेक महिने बर्फाखाली दबून राहिल्यानंतर भारतीय लष्कराने अखेर लडाखमधून आपल्या ३ जवानांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लडाखमध्ये पर्वतारोहण मोहिमेदरम्यान हिमस्खलनामुळे लष्कराचे चार जवान शहीद झाले होते. घटनेनंतर एका सैनिकाचे अवशेष सापडले, तर इतर तीन सैनिक बर्फाखाली गाडले गेले.

HAWS चे डेप्युटी कमांडंट ब्रिगेडियर एसएस शेखावत यांनी वैयक्तिकरित्या शोध मोहिमेचे नेतृत्व केले. मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि पूर्ण लष्करी सन्मानासह सैनिकांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला.

china withdrawn 75 percent of troops after progress in talks says s jaishankar
चीनबरोबर चर्चेत प्रगती; ७५ टक्के सैन्य माघारी ; चीनबरोबर चर्चेत प्रगती; ७५ टक्के सैन्य माघारी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Three friends drowned Buldhana
बुलढाणा : पोहोताना तिघे मित्र बुडाले! दोघे बचावले, एकाचा मृत्यू
two militants killed in a joint operation by army and police in jammu and kashmir
दोन दहशतवादी ठार ; काश्मीरमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत घातपाताचा कट उधळला
Manipur Curfew
Curfew  in Manipur : आता घराबाहेर पडण्यासही मनाई; मणिपूरमध्ये नेमकी परिस्थिती काय?
security tightened in manipur following fresh violence
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ड्रोन हल्ल्यांविरोधात इम्फाळमध्ये मोर्चा, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा
Bullock carts and horses also on the road in protest against potholes in Nashik
नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधातील आंदोलनात बैलगाडी, घोडेही रस्त्यावर
loksatta kutuhal Artificial Intelligence and New World Colonies
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या जगातील वसाहती

ऑक्टोबर २०२३ मध्ये काय घडले?

गुलमर्ग स्थित हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल (HAWS) ही भारतीय लष्कराच्या अंतर्गत उच्चभ्रू प्रशिक्षण संस्था आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये, भारतीय लष्कराच्या HAWS मधील ३८सैनिकांची टीम लडाखमधील माउंट कुनवर चढाई करण्याच्या मोहिमेवर गेली होती. हवालदार रोहित कुमार, हवालदार ठाकूर बहादूर आले, नाईक गौतम राजबंशी आणि लान्स नाईक स्टॅनझिन तरगाईस हे चार सैनिक या टीमचा भाग होते.

गिर्यारोहण मोहीम १ ऑक्टोबरपासून सुरू झाली आणि संघाला १३ ऑक्टोबरपर्यंत शिखर जिंकण्याची आशा होती. ८ ऑक्टोबर रोजी फरियाबाद ग्लेशियरवरील कॅम्प २ आणि कॅम्प ३ दरम्यान, १८,३०० फूट उंचीवर हिमस्खलनाचा तडाखा बसला. बर्फाच्या भिंतीवर दोरी बांधत असताना अचानक हिमस्खलन झाले. दुर्दैवाने या अपघातात चारही जवानांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – ‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ पायऱ्यांवरून खाली येत होती तरुणी, पाय घसरला अन् थेट दरीत…,थरारक घटनेचा Video Viral

सुमारे ९ महिने जमिनीखाली गाडले होते सैनिकांचे मृतदेह

या पथकाने बर्फाखाली गाडले गेलेल्या सैनिकांना वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले परंतु या हिमनदीच्या प्रदेशातील धोकदायक भूभाग आणि अप्रत्याशित हवामानामुळे मोठी आव्हाने उभी राहिली.

घटनेनंतर लगेचच लान्स नाईक स्टॅनझिन तरगाईस या सैनिकांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, तर हवालदार रोहित कुमार, हवालदार ठाकूर बहादूर आले आणि नाईक गौतम राजबंशी यांचे मृतदेह एका खड्ड्यात खोलवर अडकले होते. जवळपास नऊ महिने बर्फाच्या जाड थरांमध्ये आणि मोठ्या प्रमाणात बर्फाच्या खाली गाडले ते गेले होते.

हेही वाचा – प्रवाशांच्या जीवाशी खेळ! ओव्हरटेकिंग करण्याचा नादात तीन बसचा झाला असता मोठा अपघात; पाहा थरारक Video Viral

लष्कराने ३ सैनिकांचे मृतदेह कसे बाहेर काढले?

‘लीव्हिंग नो मॅन बिहाइंड’ या आर्मीच्या भावनेचा संकल्पनेनुसार, HAWS च्या ८८ गिर्यारोहकांच्या टीमने तीन शहीद सैनिकांचे पार्थिव शरीर बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली. हे ऑपरेशन १८ जून रोजी सुरू झाले आणि त्याला ऑपरेशन RTG असे नाव देण्यात आले.

पीटीआयच्या वृत्तानुसार, विशेष गिर्यारोहण आणि बचाव उपकरणे, विशेष कपडे, सर्व्हायव्हल किट, तंबू आणि जेवण ठेवण्यासाठी खुंबथांगपासून ४० किमी अंतरावर एक प्रमुख शिबिर उभारण्यात आले होते. सैनिकांचे पार्थिव घेऊन जाण्यासाठी आणि गरज पडल्यास बचाव पथकाला बाहेर काढण्यासाठी दोन हेलिकॉप्टरही सज्ज ठेवण्यात आले होते.

बचाव पथकाला ४ जुलै रोजी हवालदार कुमार (डोगरा स्काउट्स) यांचे पार्थिव अवशेष ३० फूट बर्फाच्या ढिगाऱ्यात सापडले तेव्हा त्यांना पहिले यश मिळाले. टीम १० फूट खोलवर गेली असता त्यांना हवालदार ठाकूर बहादूर आले (गोरखा रायफल्स) यांचा मृतदेह सापडला. ७ जुलै रोजी नाईक राजबंशी (आसाम रेजिमेंट) यांचे अवशेष जप्त केल्यानंतर, ८ जुलै रोजी ऑपरेशन संपले.

ब्रिगेडियर शेखावत हे एक अनुभवी गिर्यारोहक आहेत ज्यांनी तीन वेळा एव्हरेस्टवर चढाई केली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, चार सैनिकांचे मृतदेह बाहेर काढण्याच्या ऑपरेशनचे नेतृत्व करणे (ऑपरेशन आरटीजी) हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक मिशन होते.

ब्रिगेडियर शेखावत म्हणाले, “नऊ दिवस सलग, दररोज १०-१२ तास १८,७०० फुटांवर खोदकाम केले गेले. मोठ्या प्रमाणात बर्फ बाहेर काढण्यात आला. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही कठीण प्रयत्नांनी संपूर्ण टीमच्या लवचिकतेची चाचणी घेतली.”