ऑप्टिकल इल्यूजनची कोडी सोडवणे हे सर्वांसाठीच मनोरंजक गोष्ट आहे. पण काही कोडी इतकी अवघड असतात की सहजा सहजी सोडवता येत नाही. ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे असतात ज्यामध्ये डोळ्यासमोर असेलेली वस्तूही पटकन दिसत नाही. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे ज्यामध्ये अनेक वस्तू लपलेल्या आहेत आणि एका मिनिटांमध्ये या वस्तू तुम्हाला शोधायच्या आहेत. तुमची निरीक्षण कौशल्ये तपासण्याचा आणि सुधारण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. तुम्ही हे ऑप्टिकल इल्यूजन एकटे किंवा गटामध्ये सोडवू शकता.
बांधकामाच्या ठिकाणी लपलेल्या आहेत अनेक वस्तू
या व्हायरल फोटोमध्ये एक बांधकामाचे ठिकाण दिसत आहे जिथे काही कामगार काम करत आहेत. या चित्रात काही वस्तूं दडलेल्या आहेत ज्या तुम्हाला सहजासहजी दिसणार नाही. यासाठी तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता आणि निरिक्षण कौशल्य वापरावे लागेल. तुम्ही जास्तीत जास्त किती वस्तू शोधू शकता हे आव्हान आहे. १० सेकंदात किमान एक वस्तू तुम्ही शोधू दाखवा.
हेही वाचा – चौथी मांजर कुठे आहे? तुम्ही खरचं Cat Lover असाल तर ५ सेंकदात सांगा उत्तर
तुम्हाला दिसतायेत का या वस्तू
या फोटोमध्ये कंगवा, पेन्सिल, लिंबू, ब्रश, काठी, पुस्कत, हातमोजा, पट्टी, शिडी, चश्मा, शेंग, केळ, बेल्ट, मोजा, टोस्टर, टॉर्च, स्टिक, मफलर, सुकलेले पाण, पिझ्झा, शिडाचे बोट, लाटणे, मासा, यु लेटर या सर्व गोष्टी या फोटोत दडलले्या आहेत ज्या तुम्हाला शोधायच्या आहेत. तुम्ही १ मिनिटांत किती वस्तू शोधू शकता हे खरे चॅलेंज आहे. तुम्ही हा खेळ मित्र-मैत्रिणींसह खेळू शकता.
हेही वाचा – बेघर महिलेसह बिनधास्तपणे नाचताना दिसली तरुणी; तुमच्या चेहऱ्यावर हास्य घेऊन येईल ‘हा’ सुंदर व्हिडिओ
तुम्हाला यापैकी काही वस्तू सापडल्या नसेल तर काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी या सर्व गोष्टी शोधल्या आहेत. वरीलपैकी कोणत्या वस्तू कुठे दडल्या आहेत हे तुम्ही येथे पाहू शकता.