ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये असलेले कोडे सोडवायला बऱ्याच लोकांना आवडते. या फोटोमधून आपली बुद्धी क्षमता, चातुर्य, तीक्ष्ण नजर यांचा प्रत्यय आपल्याला येतो. काही लोकं ही कोडी सोडवण्यात तरबेज असतात आणि त्यांना नवनवीन कोडी सोडवायला आवडतं. म्हणूनच असे ऑप्टिकल इल्युजनचे फोटो तुफान व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन असलेले एक गोड चित्र व्हायरल झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रामध्ये आपण तीन गोंडस पांडा पाहू शकतो. पांडा हे प्राणी खूपच गोड आणि गोंडस असतात. निरुपद्रवी असलेले हे प्राणी सर्वांनाच खूप आवडतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये तीनपेक्षा जास्त पांडा लपलेले आहेत. या फोटोमध्ये एकूण १२ पांडा लपलेले आहेत आणि हे पांडा शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ ३० सेकंदाचा अवधी आहे.

अंगणातील स्विमिंग पूलमुळे ‘हे’ जोडपं झालं कोट्याधीश; कमाई पाहून तुम्हीही व्हाल थक्क

व्हायरल झालेल्या या चित्रात दोन मोठे पांडा आणि एक पिल्लू एकत्र बसलेले आहेत. पहिल्यांदा पाहिल्यावर जरी आपल्याला या चित्रामध्ये फक्त तीन पांडा दिसत असले, तरीही प्रत्यक्षात मात्र या चित्रामध्ये एकूण १२ पांडा लपलेले आहेत. चॅलेंज म्हणजे हे १२ पांडा तुम्हाला फक्त ३० सेकंदांमध्ये शोधून काढायचे आहेत. जर तुम्ही हे कोडे सोडवण्यात यशस्वी झालात तर तुम्ही जिनिअस सिद्ध व्हाल.

हे चित्र नीट निरखून पाहा. या चित्रातील प्रत्येक कोपरा आणि बारीकसारीक गोष्टी नीट तपासा. तुम्हाला कुठे ना कुठे पांडा नक्कीच सापडेल. मात्र जर तुम्हाला पांडा शोधण्यात अडचणी येत असतील तर काळजी करू नका. आपण हे पांडा शोधून काढूया.

Optical Illusion: तुम्ही या चित्रात सर्वप्रथम काय पाहिले? उत्तरावरून जाणून घेता येणार तुमचं व्यक्तिमत्त्व

Photo : Social Media

तुम्ही चित्रातील धबधबा, डोंगर, झाडे, फुलं नीट निरखून पाहिली तर तुम्हाला हे पांडा सहज सापडतील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion a total of 12 pandas are hidden in this picture can you find it in 30 seconds pvp