सोशल मीडियावर सध्या पटकन व्हायरल होणारा एक रंजक प्रकार म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. ऑप्टिकल इल्युजन हा आता बऱ्याच जणांच्या सवयीचा भाग झाला आहे. त्यामध्ये असणारी कोडी सोडवणे, व्यक्तीमत्वाबद्दल काही विशेष संकेत ओळखणे हे काही जणांना तणाव घालवण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असेच ऑप्टिकल इल्युजनचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. काय आहे यामधलं चॅलेंज जाणून घ्या.

व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये एक झाड दिसत आहे. या झाडाव्यतिरिक्त या फोटोमध्ये आणखी काही नाही असे वाटेल. पण या फोटोमध्ये तीन ससे लपले आहेत. हे ससे कुठे आहेत हे शोधण्याचे चॅलेंज आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ससे शोधता येतायत का पाहा.

आणखी वाचा : वाघाबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही अन्…; थरकाप उडवणारा Viral Video एकदा पाहाच

फोटो :

जर तुम्हाला ओळखता आले नसेल तर या फोटोमधून तुम्हाला ससे कुठे आहेत ते स्पष्ट होईल.

दररोज असे ऑप्टिकल इल्युजनचे फोटो व्हायरल होत असतात. अनेकजण आपल्या मित्रांना हे शेअर करत यातील कोडी सोडवण्याचे चॅलेंज देतात.