Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या फोटोमध्ये एक फुलपाखरू लपलेल आहे. जे तुम्हाला शोधायची आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.
फुलपाखरू शोधणे इतके सोपे नाही
या चित्रात एक छोटासा रंगीबेरंगी तलाव दिसत आहे. त्यात छोटी झाडे आणि दगड देखील आहेत. या सर्वांमध्ये एक फुलपाखरूही बसले आहे. जे तुम्हाला शोधायचे आहे. अनेकांनी हे फुलपाखरू शोधण्याचा प्रयत्न केला मात्र काहीजणांना हे फुलपाखरु शोधता आले आहे. तुम्हीही हे फुलपाखरू शोधा आणि ते कुठे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा.
( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोत लपलेली मगर तुम्ही शोधू शकता का? समोर असून सुद्धा अनेकजणांना दिसली नाही)
तुम्हाला फुलपाखरू दिसले का?
या चित्राची गंमत म्हणजे हे फुलपाखरू अजिबात दिसत नाही आहे. कलाकाराने त्याला अशाप्रकारे लपवले आहे की, शोधणे जवळपास कठीणच आहे. तलावाच्या मधोमध दगडांमधूनही रस्ता तयार केल्याचे चित्रात दिसत आहे. तलावाभोवती इतरही अनेक वस्तू पडून आहेत. पण या सगळ्या गोष्टींमध्ये अचानक ते फुलपाखरू दिसत नाही. पण जर तुम्हाला हे फुलपाखरू दिसले तर तुम्ही बुद्धिमान ठराल..
येथे आहे फुलपाखरू
प्रत्यक्षात हे फुलपाखरू तलावाच्या पाण्यात बसले आहे. हे फुलपाखरू चित्राच्या खालच्या डाव्या कोपर्यात पडलेल्या कमळाच्या एका पानावर बसले आहे. ते बघायला खूप छान दिसत आहे. फुलपाखराला चित्रासोबत अशा प्रकारे लपवण्यात आले आहे की आहे की ते दिसत नाही पण काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर हे फुलपाखरू कुठे आहे हे कळते.