ऑप्टिकल इल्युजनचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो, कोडी, चित्र हे अनेकांच्या करमणुकीचे साधन झाले आहे. यातील कोडी सोडवणे, विशिष्ट चॅलेंज स्विकारणे यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे मानले जाते. असेच ऑप्टिकल इल्युजनचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोमध्ये काही झाड आणि जमिनीवर पडलेली सुकलेली पान दिसत आहेत. या फोटोमध्ये एक कुत्रा सुद्धा आहे, तो कुठे आहे हे शोधण्याचे चॅलेंज आहे. तुम्हाला कुत्रा कुठे आहे ते शोधता येतय का पाहा.

फोटो :

जर तुम्हाला कुत्रा कुठे आहे ते दिसले नसेल तर पुढील फोटो पाहून तुम्हाला याचे उत्तर मिळेल.

या फोटोमध्ये जमिनीवर पडलेल्या पानांचा रंग आणि कुत्र्याचा रंग सारखा वाटत असल्याने पटकन कुत्रा कुठे आहे हे ओळखणे कठीण जाते. तुम्ही या फोटोत कुत्रा कुठे आहे हे शोधण्याचे चॅलेंज तुमच्या मित्रांनाही देऊ शकता.

Story img Loader