रोजच्या प्रवासादरम्यान करमणुकीसाठी सध्या ऑप्टिकल इल्युजन हा पर्याय निवडला जातो. प्रवासादरम्यान किंवा दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऑप्टिकल इल्युजनची कोडी सोडवणे काही जणांच्या सवयीचा भाग झाला आहे. तसेच यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असेच ऑप्टिकल इल्युजनचे एक चित्र सध्या व्हायरल होत आहे. काय आहे यामधलं चॅलेंज जाणून घ्या.

व्हायरल होणाऱ्या या चित्रामध्ये एक व्यक्ती बर्फाळ प्रदेशात बंदुकीने कशावर तरी निशाणा साधत असल्याचे दिसत आहे. पण या चित्रात फक्त हा माणूस नसुन एक अस्वल देखील आहे. हे अस्वल कुठे आहे हे शोधण्याचे चॅलेंज आहे. तुम्हाला या फोटोमध्ये अस्वल शोधता येतय का पाहा.

फोटो :

जर तुम्हाला अस्वल कुठे आहे ते ओळखता आले नसेल तर हे दुसरे चित्र पाहून तुम्हाला तो कुठे आहे ते दिसेल.

या चित्रामध्ये अस्वल शोधण्याचे चॅलेंज तुम्ही तुमच्या मित्रांनादेखील देऊ शकता.