सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर तर काही महत्वाचा संदेश देणाऱ्या अशा गोष्टींचा यात समावेश असतो. यातीलच एक रंजक प्रकार म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. ऑप्टिकल इल्युजन हा आता बऱ्याच जणांच्या सवयीचा भाग झाला आहे. त्यामध्ये असणारी कोडी सोडवणे, व्यक्तीमत्वाबद्दल काही विशेष संकेत ओळखणे हे काही जणांना तणाव घालवण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असाच एक ऑप्टिकल इल्युजनचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. काय आहे यामधलं चॅलेंज जाणून घ्या.
व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये बर्फाळ प्रदेश दिसत आहे. या जागी एक अस्वल देखील आहे, पण तो नेमका कुठे आहे, हे शोधण्याचे चॅलेंज आहे. तुम्हाला अस्वल शोधता येतोय का पाहा.
फोटो :
तुम्हाला जर अस्वल कुठे आहे हे शोधता आले नसेल तर पुढील फोटो पाहून तुम्हाला ते स्पष्ट होईल.
बर्फाचा आणि अस्वलाचा रंग सारखा असल्याने या फोटोमध्ये पटकन अस्वल कुठे आहे हे शोधणे कठीण जाते. या फोटोत अस्वल शोधण्याचे चॅलेंज तुमच्या मित्रांनाही देऊ शकता.