रोजच्या प्रवासादरम्यान कंटाळा येणे स्वाभाविक आहे. अशावेळी दिवसभराचा कामाचा ताण आणि प्रवासाची दगदग यामुळे काही तणाव कमी करणाऱ्या गोष्टींची गरज असते. सध्या यासाठी ऑप्टिकल इल्युजन हा पर्याय निवडला जातो. प्रवासादरम्यान किंवा दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऑप्टिकल इल्युजनची कोडी सोडवणे काही जणांच्या सवयीचा भाग झाला आहे. तसेच यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असेच ऑप्टिकल इल्युजनचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. काय आहे यामधलं चॅलेंज जाणून घ्या.

व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये एक खोली दिसत आहे. या खोलीमध्ये क्रिसमस ट्री, सोफा, डायनिंग टेबल, माईक स्टॅंड अस बरच सामान दिसत आहे. या सामानामध्ये एक मांजर लपलेली आहे. या मांजरीला शोधण्याचे चॅलेंज देण्यात आले आहे. तुम्हाला ही मांजर कुठे आहे ते ओळखता येतय का पाहा.

फोटो :

जर तुम्हाला मांजर कुठे आहे ते शोधता आले नसेल, तर खुर्चीजवळ पुन्हा एकदा पाहा. डायनिंग टेबलच्या एका खुर्चीवर कापड ठेवले आहे, त्यामागे मांजर लपली आहे. तुम्ही हे मांजर शोधण्याचे चॅलेंज तुमच्या मित्रांनाही देऊ शकता.