Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. ज्या फोटोत एक कुत्रा लपलेला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.

फोटोमध्ये लपला आहे कुत्रा

( हे ही वाचा: Optical Illusion: खोलीत नेमका कुठे ठेवलाय इअरफोन? तुम्ही शोधू शकता का?)

या फोटोत एक वृद्ध व्यक्ती बसलेली दिसत आहे. तुम्हाला त्याच्या आजूबाजूला काही मेंढ्याही दिसतील. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या चित्रात एक कुत्राही लपून बसला आहे. अनेकांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र ते अयशस्वी ठरले आहेत. तुम्हाला या फोटोतील कुत्रा दिसला का?

ही हिंट ट्राय करा

आम्ही तुम्हाला सांगतो की हा फोटो जवळून पाहिल्यानंतर तुम्हाला योग्य उत्तर मिळण्याची शक्यता वाढू शकते. तरीही बरोबर उत्तर दिसले नाही तर एकदा फोटो उलटा करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. पण तरीही तुम्हाला हे कोडे सोडवता येत नसेल तर खालील फोटोतील उत्तर पहा.

( हे ही वाचा: Optical Illusion: चित्रात लपले आहेत इंग्रजीचे ३ शब्द; तुम्हाला ते दिसलेत का?)

काही लोक यशस्वी झाले

हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फक्त काही लोक हे कोडे सोडवू शकले. तुम्ही पण बरोबर उत्तर दिले असेल, तर अभिनंदन, तुम्हीही हुशार लोकांच्या यादीत सामील झाला आहात.