ऑप्टिकल इल्युजन हा प्रकार सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे. मोकळ्या वेळेत ऑप्टिकल इल्युजनमधील फोटो, व्हिडीओ पाहणे बऱ्याच जणांच्या सवयीचा भाग झाला आहे. त्यामध्ये असणारी कोडी सोडवणे, त्यातून व्यक्तीमत्वाबद्दल काही विशेष संकेत ओळखणे हे काही जणांना तणाव घालवण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये जंगल दिसत आहे. या जंगलामध्ये एक कोल्हा लपला आहे. हा कोल्हा कुठे आहे हे शोधण्याचे चॅलेंज आहे. हा फोटो पाहून तुम्हाला कोल्हा कुठे आहे ओळखता येत आहे का पाहा.
आणखी वाचा : मालकाच्या पायाचा फ्रॅक्चर पाहून कुत्र्याने केले असे काही की…; व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा पाहाच
फोटो :

जर तुम्हाला फोटोमध्ये कोल्हा कुठे आहे ते दिसले नसेल तर, या फोटोमधून तुम्हाला कोल्हा कुठे आहे ते स्पष्ट होईल.

या फोटोमध्ये १० सेकंदात कोल्हा शोधण्याचे चॅलेंज तुमच्या मित्रांनादेखील देऊ शकता.