ऑप्टिकल इल्युजन हा मनोरंजनाचा नवा प्रकार रोज सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहतो. ऑप्टिकल इल्युशन आता बऱ्याच जणांच्या सवयीचा भाग झाला आहे प्रवासादरम्यान किंवा रिकामा वेळ असताना लोकांना ऑप्टिकल इल्युजनची कोडी सोडवण्यास किंवा त्यातील दिलेले चॅलेंज पूर्ण करण्यास आवडते. यामुळे अनेक जणांना ताण विसरायला मदत होते, तसेच यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असाच एक ऑप्टिकल इल्युजनचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये एक झाड दिसत आहे. या झाडात एक बेडूक लपले आहे. ते बेडूक नेमके कुठे आहे, ते शोधण्याचे चॅलेंज आहे. तुम्हाला या फोटोत लपलेला बेडूक शोधता येतोय का पाहा.
फोटो :

जर तुम्हाला या फोटोमध्ये लपलेला बेडूक कुठे आहे ते शोधता आले नसेल, तर पुढील फोटो पाहून तुम्हाला ते स्पष्ट होईल.

नजर तीक्ष्ण असणाऱ्यांनाच फोटोमध्ये लपलेला बेडूक पटकन शोधता येतो. या फोटोमध्ये बेडूक कुठे लपला आहे हे शोधण्याचे चॅलेंज तुमच्या मित्रांना देखील देऊ शकता.