सोशल मीडियावर दररोज व्हायरल होणाऱ्या गोष्टींमधील एक प्रकार म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. ऑप्टिकल इल्युशन आता बऱ्याच जणांच्या सवयीचा भाग झाला आहे प्रवासादरम्यान किंवा रिकामा वेळ असताना लोकांना ऑप्टिकल इल्युजनची कोडी सोडवण्यास किंवा त्यातील दिलेले चॅलेंज पूर्ण करण्यास आवडते. असाच एक ऑप्टिकल इल्युजनचे चित्र सध्या व्हायरल होत आहे. काय आहे याचे चॅलेंज जाणून घ्या.
ऑप्टिकल इल्युजनच्या या चित्रात दोन व्यक्ती एका दरवाजासमोर उभे असलेल्या दिसत आहे. पण या चित्रात आणखी एक जण आहे. एक चोर या चित्रात कुठेतरी लपला आहे आणि त्याला शोधण्याचे हे चॅलेंज आहे. तुम्हाला तो चोर शोधता येतोय का पाहा.
फोटो :
तुम्हाला चोर कुठे आहे हे शोधता आले नसेल तर, पुढे दिलेले चित्र तुमची चोर दाखवण्यात मदत करेल.
हे चित्र सध्या व्हायरल होत आहे. मित्रांना हे चित्र दाखवत तुम्ही यातील चोर शोधण्याचे चॅलेंज देऊ शकता.