Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या फोटोमध्ये एक लहान बाळ दिसत आहे जो आपल्या आईला शोधत आहे. या लहान मुलाची आई या फोटोत लपली आहे. जी तुम्हाला शोधायची आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.
तुम्हाला या लहान बाळाची आई दिसली का?
दिलेल्या चित्रामध्ये एक लहान बाळ दिसत आहे. ज्याच्या हातात एक दुधाची बाटली आहे. या बाळाला कदाचित भूक लागली असेल त्यामुळे तो त्याच्या आईला शोधत आहे. त्याच्या आईला शोधण्यात तुम्हाला त्याची मदत करायची आहे. आईला शोधणे इतके सोपे नाही कारण कलाकारने त्याला अशाप्रकारे लपवलं आहे की शोधणे कठीण आहे. मात्र तुम्ही नीट पाहिल्यास तुम्हाला ती दिसू शकते.
( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोत लपलंय एक सुंदर फुलपाखरू; तुम्ही शोधू शकता का?)

येथे आहे या लहान मुलाची आई
तुम्ही नीट पाहिल्यास बाळाने स्कार्फसारखे कपडे घातले आहेत आणि डाव्या हातात दुधाची बाटली धरलेली आहे. बाळाच्या कंपड्यांमध्येच आई लपलेली आहे. तुम्हाला आताही ती दिसली नसेल तर चिंता करू नका आम्ही तुम्हाला खाली दिलेल्या चित्रामधून आई कुठे आहे ते दाखवून देऊ. आईला शोधण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल उजवीकडे फिरवावा लागेल. उजव्या दिशेने मोबाईल फिरवताच तुम्हाला आईचा चेहरा हळूहळू दिसू लागेल.
( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोमध्ये लपले आहेत एकूण ११ वाघ; तुम्हाला किती दिसले? यावरून ठरेल तुमचे व्यक्तिमत्व)

व्हायरल ऑप्टिकल भ्रम
असे ऑप्टिकल भ्रम सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात आणि लोकांचे मनोरंजन करत राहतात. ऑप्टिकल भ्रम सोडवून, लोक स्वतःला एक तीक्ष्ण मेंदू आहे असे समजू लागतात.