असं अनेकदा होतं की एखादी गोष्ट आपल्या समोरच असते पण आपल्याला ती दिसत नाही. याचा अर्थ आपली दृष्टी कमकुवत आहे असे नाही. तर, अनेकदा अगदी लहानसहान गोष्टी आपल्याला लगेच दिसून येत नाहीत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो एखाद्या कोड्याप्रमाणे आहे. हा फोटो बघून नेटकरी हैराण झाले आहेत. या फोटोमध्ये एक पक्षी लपलेला आहे. तुम्हाला हा पक्षी सापडला का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या फोटोमध्ये एका पक्षाची आकृती दिसत आहे. पण तरीही अनेकजणांना हा पक्षी कोण आहे आणि तो कुठे आहे हे ओळखता येत नाही आहे. हा फोटो आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘ध्यानस्थ घुबड डोळे मिटून बसले आहे.’ यानंतर सोशल मीडियावर लोकांनी या चित्रात लपलेल्या पक्ष्याचा शोध सुरू केला.

या Viral Photo मध्ये लपलेली मुलगी शोधणे इतके सोपे नाही; तुम्हीही करून पाहा प्रयत्न

बर्‍याच लोकांनी पक्ष्याची आकृती शोधली. अनेकांनी पक्ष्याचे नावही सांगितले. मात्र, त्यात लपलेल्या पक्ष्याची आकृती शोधण्यात बहुतांश लोकांना अपयश आले. या फोटोला आतापर्यंत हजारो लाइक्स मिळाले आहेत. त्याचवेळी, अनेक लोक चित्र शेअर करून पक्ष्याची आकृती आणि पक्ष्याचे नाव शोधण्याचे आव्हान इतरांना देत आहेत.

तुम्हाला हा पक्षी सापडला का?

हे चित्र पाहिल्यानंतर अनेक वापरकर्त्यांनी पक्ष्याचे योग्य नाव सांगितले. त्याच वेळी, अनेक वापरकर्ते म्हणत आहेत की चित्रात कोणत्याही पक्ष्याची आकृती नाही. अनेक वापरकर्त्यांनी फोटो झूम करून पक्ष्याची आकृती दाखवली. जेणेकरून लोकांना समजेल की या चित्रात खरंच एक पक्षी दडलेला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion can you find the bird hidden in this picture 99 percent people failed pvp