सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. यातील बऱ्याच गोष्टी मजेशीर असतात, काही भयानक असतात, तर काही गोष्टी आपल्याला गोंधळात टाकणाऱ्या असतात. सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो, व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. हे फोटो लोकांना विचार करायला भाग पाडतात. काही लोक या फोटोमधील कोडी पटकन सोडवतात, मात्र काहीजणांना हे जमत नाही. तरीही सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोची क्रेझ आहे.

ऑप्टिकल इल्युजन जितके मजेदार असतील तितकेच ते तुमच्या मेंदूला गोंधळात टाकतात. अनेकांना त्यांच्याद्वारे त्यांच्या बुद्धीची चाचणी घेणे किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेणे आवडते. अनेकजण ते सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. परंतु काही तल्लख बुद्धिमत्ता असलेलेही लोक आहेत जे दिलेल्या वेळेत ऑप्टिकल इल्युजन सोडविण्यास सक्षम आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे कोडे सोडवण्यासाठी तुमच्याकडे एकूण २० सेकंद आहेत.

तुम्ही झूम करून थकाल पण हे चित्र संपणार नाही; Viral कलाकृतीने नेटकऱ्यांना लावलंय वेड

या चित्रात तुम्हाला बर्फाळ प्रदेशातील बिबट्या शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे काम इतकं सोपं नसलं तरी मेंदूवर आणि डोळ्यांवर थोडंसं जोर देऊन हे कोडे सोडवता येईल. या चित्रात बिबट्या अशा प्रकारे लपला आहे की त्याला शोधणं तुम्हाला कठीण जाणार आहे. तुम्हाला जर २० सेकंदाच्या आत बिबट्या दिसला तर तुमची बुद्धी आणि नजर खरंच तल्लख आहे. मात्र जर तुम्हाला हा बिबट्या सापडला नसेल तर हरकत नाही. पुन्हा एकदा फोटोच्या मध्यभागी बिबट्या शोधण्याचा प्रयत्न करा.

Optical Illusion
Photo : Social Media

हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रत्येकाला असे ऑप्टिकल इल्युजन सोडवण्यात आनंद होतो. हे इल्युजन तुम्ही सोडवले केले तर तुमच्या मनातील आत्मविश्वास वाढतो.

Story img Loader