प्रवासादरम्यान किंवा दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऑप्टिकल इल्युजनची कोडी सोडवणे किंवा त्यातील चॅलेंज असणाऱ्या गोष्टी शोधणे हे काही जणांच्या सवयीचा भाग झाले आहे. ऑप्टिकल इल्युजनमुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असेच ऑप्टिकल इल्युजनचे एक चित्र सध्या व्हायरल होत आहे. काय आहे यामधलं चॅलेंज जाणून घ्या.
या चित्रामध्ये दोन व्यक्ती एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. वरवर पाहता या चित्रामध्ये फक्त दोनच व्यक्ती आहेत अस तुम्हाला वाटेल. पण या चित्रामध्ये दोन नाही तर तीन व्यक्ती आहेत, तिसरी व्यक्ती कुठे आहे हे शोधण्याचे चॅलेंज आहे. तुम्हाला तिसरी व्यक्ती कुठे आहे ते ओळखता येतय का पाहा.
आणखी वाचा : आजीच्या मृत्यूबद्दलच्या Linkedin पोस्टमुळे बड्या कंपनीचा CEO ठरतोय टीकेचा धनी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
फोटो :
तुम्हाला जर तिसरी व्यक्ती कुठे आहे ते ओळखता आले नसेल, तर या चित्रामध्ये डाव्या बाजुला असणाऱ्या महिलेच्या दोन हातांच्यामध्ये पुन्हा पाहा, तिथे तुम्हाला एक झोपलेली व्यक्ती दिसेल. ऑप्टिकल इल्युजनचे हे चॅलेंज तुम्ही तुमच्या मित्रांना देऊन त्यांना ३० सेकंदात तिसरी व्यक्ती कुठे आहे हे शोधण्यास सांगू शकता.