Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक चित्र खूप चर्चेत आहे. चित्रात एक मांजर लपलेली आहे. जी तुम्हाला शोधायची आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.
व्हायरल झालेल्या चित्रामध्ये तुम्हाला दोन महिला समोरासमोर बसलेल्या दिसत आहेत. त्याचवेळी एका महिलेच्या पायाजवळ एक काळी मांजरही बसली आहे. या काळ्या मांजराचा जोडीदार शोधून सांगणे हे आव्हान आहे. चित्रात एक महिला बाटलीकडे बोट दाखवत काहीतरी बोलत आहे, तर दुसरी महिला हसत हसत तिचे बोलणे ऐकत आहे. बरं, चित्रात कुठेतरी लपलेली दुसरी लपलेली मांजर शोधणे हे तुमचे काम आहे. तुम्हालाही ती सापडेल याची आम्हाला खात्री आहे. परंतु तुमच्याकडे तिला शोधण्यासाठी फक्त ५ सेकंद आहेत.
( हे ही वाचा: Optical Illusion: चित्रात लपलेली हिऱ्याची अंगठी तुम्ही शोधू शकता का? ९९% लोकं ठरलीत अपयशी)
तुम्ही दुसरी मांजर पाहिली आहे का?
माणूस हा चांगला निरीक्षक असतो असे अनेकदा म्हटले जाते. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे निरीक्षण कौशल्य चांगले आहे, तरच हे आव्हान घेण्याचा विचार करा, कारण आम्ही आधीच सांगितले आहे की ९९ टक्के लोक ही ऑप्टिकल इल्युजन चाचणी पास करू शकले नाहीत. जर तुम्हाला ५ सेकंदात मांजर सापडली तर तुमचा बुद्ध्यांक पातळी इतरांपेक्षा खूप जास्त आहे.
(हे ही वाचा: या व्यक्तीच्या चेहऱ्यात लपल्या आहेत त्याच्याच ३ मुली; २० सेकंदात तुम्ही शोधू शकता का?)
येथे आहे दुसरी मांजर
आपण मांजर शोधण्यात अयशस्वी झाल्यास, काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला काही हिंट देणार आहोत. त्यासाठी महिलांचे कपडे काळजीपूर्वक पहा. होय, प्रत्येक ड्रेसवर एक नजर टाका. तुम्हाला लपलेली मांजर दिसेल. तरीही सापडले नाही तर दुसरी मांजर कुठे लपली आहे ते आम्ही खालील चित्र पहा.
तुमचा भ्रमनिरास करण्यासाठी ऑप्टिकल इल्युजन निर्माण केले जातात आणि यामुळे गोंधळायला होते.