ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो रोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. यामध्ये देण्यात आलेले चॅलेंज, कोडयांचे उत्तर समोरच असते पण ते अशाप्रकारे लपवलेले असते की ते पटकन ओळखता येत नाही. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो आयएफएस अधिकारी धरमवीर मीना यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
या फोटोमध्ये एक झाड आणि मातीचा ढीग दिसत आहे. पण या फोटोत एक बिबट्याही लपला आहे. तुम्हाला तो बिबट्या कुठे आहे ते ओळखता येते का पाहा.
आणखी वाचा- Video: एअरपोर्टवर पहिल्यांदा गेलेल्या माणसाची ‘ही’ करामत होतेय Viral; सामानाच्या जागी स्वतः जाऊन…
व्हायरल फोटो:
जर तुम्हाला हा फोटो पाहून बिबट्या कुठे आहे ते समजले नसेल तर पुढील फोटो पाहून तुम्हाला ते स्पष्ट होईल.
मातीचा रंग आणि बिबट्याचा रंग सारखाच असल्याने या फोटोत बिबट्या कुठे आहे ते पटकन ओळखणे कठीण जाते.