सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर तर काही महत्वाचा संदेश देणाऱ्या अशा गोष्टींचा यात समावेश असतो. यातीलच एक रंजक प्रकार म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. ऑप्टिकल इल्युजन हा आता बऱ्याच जणांच्या सवयीचा भाग झाला आहे. त्यामध्ये असणारी कोडी सोडवणे, व्यक्तीमत्वाबद्दल काही विशेष संकेत ओळखणे हे काही जणांना तणाव घालवण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असेच एक चित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रात डोंगर आणि झाडं दिसत आहेत. पण यामध्ये एक फोटोग्राफर देखील लपला आहे. हा फोटोग्राफर कुठे आहे, ते शोधण्याचे चॅलेंज आहे. तुम्हाला फोटोग्राफर कुठे आहे ते शोधता येतय का पाहा.

फोटो :

तुम्हाला या चित्रात जर फोटोग्राफर कुठे आहे ते दिसले नसेल तर फोटोच्या डाव्या बाजुला असणाऱ्या दोन लहान झाडांकडे पुन्हा नीट पाहा, त्या दोन झाडांमध्ये तुम्हाला फोटोग्राफर दिसेल. या चित्रामध्ये फोटोग्राफर शोधण्याचे चॅलेंज तुम्ही मित्रांनाही देऊ शकता.