सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर तर काही महत्वाचा संदेश देणाऱ्या अशा गोष्टींचा यात समावेश असतो. यातीलच एक रंजक प्रकार म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. ऑप्टिकल इल्युजन हा आता बऱ्याच जणांच्या सवयीचा भाग झाला आहे. त्यामध्ये असणारी कोडी सोडवणे, व्यक्तीमत्वाबद्दल काही विशेष संकेत ओळखणे हे काही जणांना तणाव घालवण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असेच एक चित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

ऑप्टिकल इल्युजनच्या या चित्रात एक माणूस रस्त्यावर उभा असलेला दिसत आहे. पण या चित्रात हा माणूस एकटा नसुन त्याच्याबरोबर एक महिला देखील आहे. चित्रात महिला कुठे आहे हे शोधण्याचे चॅलेंज आहे. तुम्हाला महिला कुठे आहे ते ओळखता येतय का पाहा.

फोटो :

तुम्हाला जर महिला कुठे आहे हे ओळखता आले नसेल तर पुढील चित्र पाहून तुम्हाला ते स्पष्ट होईल.

या चित्रात लपलेली महिला कुठे आहे हे शोधण्याचे चॅलेंज तुमच्या मित्रांनाही देऊ शकता.

Story img Loader