Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. ज्यात तुम्हाला काही मूर्त्या दिसतील. या मूर्त्यांमध्ये एक माणूस देखील लपलेला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.
मूर्तींमध्ये लपलाय एक माणूस..
चित्रात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती वेगवेगळ्या पोझमध्ये उभ्या असलेल्या पाहू शकता. काही मूर्ती बसून, तर काही मूर्ती उभ्या केल्या आहेत. पण या मूर्त्यांमध्ये एक माणूस देखील उभा आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. हे कोडे खरं तर अवघड आहे. मात्र थोडा प्रयत्न केल्यास तुम्हाला या चित्रातील लपलेला माणूस दिसेल. हे कोडे सोडवण्यासाठी तुम्हाला ९ सेकंदाचा वेळ मिळेल.
तुम्हाला कोडे सोडवता येईल का?
जर तुम्ही बागेत उपस्थित असलेल्या सर्व मूर्ती चांगल्या प्रकारे पाहिल्या असतील तर तुम्हाला तो माणूस कुठे उभा आहे हे नक्कीच समजले असेल. जर तुम्ही अजूनही गोंधळात असाल, तर आम्ही तुम्हाला एक इशारा देतो की ही लपलेली व्यक्ती डाव्या बाजूला असलेल्या दोन मूर्तींमध्ये आहे.
( हे ही वाचा: ‘हे’ आहे जगातील सर्वात लहान नाव असलेले रेल्वे स्टेशन; वाचून तुम्हीही थक्क व्हाल)
येथे लपलाय माणूस…
जर तुम्हाला अजूनही ही व्यक्ती दिसली नसेल तर आम्ही तुम्हाला याचे उत्तर सांगणार आहोत. खाली दिलेल्या चित्रात आम्ही तुम्हाला याचे उत्तर सांगितले आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की पुतळ्याच्या वेशभूषेत उभी असलेली व्यक्ती हातात घातलेल्या घड्याळाकडे पाहत आहे.