Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या फोटोत एक हेलिकॉप्टर हरवले आहे. जे तुम्हाला शोधायचे आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.

तुम्हाला हेलिकॉप्टर दिसले का?
जर तुमचे उत्तम निरीक्षण कौशल्य असेल तर तुम्हाला या चित्रात हेलिकॉप्टर दिसायला वेळ लागणार नाही. जर तुम्ही ५ सेकंदात हेलिकॉप्टर शोधू शकत असाल तर तुम्ही हुशार आहात. या फोटोत हेलिकॉप्टर शोधणे थोडे कठीणच आहे. कारण कलाकाराने ते चित्रात अशाप्रकारे लपवले आहे की ते सहज शोधता येत नाहीये. पण जर तुम्ही हे चित्र नीट पाहिल्यास तुम्हाला या चित्रात हेलिकॉप्टर सहज दिसेल.
( हे ही वाचा: ‘हे’ आहे जगातील असे एकमेव स्टेशन ज्याचे नाव वाचताना तुमचीही जीभ अडखळेल; हवं तर ट्राय करा)
येथे आहे हेलिकॉप्टर
आतापर्यंत तुम्हाला हेलकॉप्टर दिसले असेल तर तुम्ही खरच हुशार आहात. जे लोक अजूनही शोधत आहेत त्यांना चिंता करण्याची गरज नाही कारण आम्ही हेलिकॉप्टर कुठे आहे ते सांगणार आहोत. हेलिकॉप्टर खडकात लपले आहे, त्यामुळे ते शोधणे कठीण झाले आहे. चित्र काळजीपूर्वक पहा, चित्रात हेलिकॉप्टर कुठेही उपस्थित असू शकते. हेलिकॉप्टर चित्राच्या मध्यभागी थोडेसे वर उडत आहे.