Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. दिलेल्या चित्रामध्ये एक जंगल दिसत आहे. या जंगलामध्ये एक हरिण लपलेले आहे. जे तुम्हाला शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कोडे तुमच्या व्यक्तिमत्वाचा खुलासा करते.
हरीण तुमच्या डोळ्यासमोर आहे
फोटोमध्ये एक जंगल दिसत आहे, त्यामध्ये एक हरिण देखील आहे. पण ते नेमकं कुठे आहे ते लोक शोधत आहेत. अनेकांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांना देखील हे हरिण दिसले नाही. जर तुम्ही देखील हरिण शोधत असाल तर त्याआधी ७ सेकंदाचा टायमर लावा. हे हरिण शोधणे सोपे नाही आहे. जर तुम्ही देखील हे हरिण शोधू शकलात तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत आणि तुम्ही बुद्धिमान ठराल.
( हे ही वाचा: Optical Illusion: या फोटोमध्ये लपलाय एक भयानक वाघ; तुम्ही त्याला शोधू शकता का?)

तुम्हाला हरीण सापडले का?
चित्रात दडलेल्या हरणाचा रंग जंगलातील झाडे-वनस्पतींशी मिळताजुळता असल्याने त्याचा शोध घेणे कठीण आहे. तुम्हाला जर हरीण दिसले असेल तर तुमचे अभिनंदन, जे अजूनही हरीण शोधत आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक हिंट देत आहोत. चित्राच्या उजव्या बाजूला हरीण लपलेले आहे. तरीही तुम्हाला हरीण सापडले नसेल, तर खाली दिलेला फोटो पाहा, ज्यामध्ये तुम्हाला जंगलात लपलेले हरीण पाहायला मिळेल.

( हे ही वाचा: Optical Illusion: फोटोमधील रंगीबेरंगी बागेत लपलाय एक पोपट; तुम्ही त्याला शोधू शकता का?)
फक्त १% लोक यशस्वी झाले!
या फोटोने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले. ऑप्टिकल भ्रम इतके मजेदार आहेत की प्रत्येकाला ते सोडवणे आवडते. एवढेच नाही तर ते सोडवल्यानंतर लोक स्वतःला हुशार समजू लागतात. तुम्हीही हे कोडे सोडवले असेल तर तुमचे मन आणि डोळे आश्चर्यकारक आहेत.