Optical Illusion: तुमची दृष्टी खरोखर किती तीक्ष्ण आहे, याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे? बरं केला नसेल तर त्याची चाचणी गेण्याचा हा एक मजेदार मार्ग आहे. आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑप्टिकल इल्युजनचं चॅलेंज घेऊन आलो आहोत. हे चॅलेंज खरं तर एकदम सोपं आहे.

ऑप्टिकल इल्यूजनचं चॅलेंज (Optical Illusion Challenge)

फक्त सात सेकंदांत तुम्ही या हिरव्या वर्तुळातील लपलेला आकडा शोधू शकता का?

Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
The rambunctious bull came straight out of the ring
खतरनाक! उधळलेला बैल थेट कूंपण तोडून बाहेर आला… पुढच्या पाच सेकंदात जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल

सुरुवातीला तुम्हाला फक्त हिरव्या रंगाचं एक वर्तुळ दिसेल; पण जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं, तर त्यात तुम्हाला दोन अंकी आकडा दिसेल. एखाद्याची दृष्टी तीक्ष्ण असेल, तर त्याला हा नंबर लगेच दिसेल.

तुमच्याकडे फक्त सात सेकंदं असली तरी घाई न करता, वर्तुळावर काळजीपूर्वक लक्ष केंद्रित करा. वर्तुळाच्या प्रत्येक विभागाचं बारकाईनं निरीक्षण करणं ही यातली मुख्य व महत्त्वपूर्ण बाब आहे. तुमची वेळ संपल्यानंतरही तुम्ही तिथेच अडकला असाल, तर काळजी करू नका. आम्ही या प्रश्नाचं उत्तर शेवटी देऊ. परंतु, त्याआधी प्रथम अशा प्रकारची कोडी फक्त मजेसाठी आहेत का, नेमका याचा उपयोग आणि फायदा काय ते जाणून घेऊ.

ऑप्टिकल इल्युजनसारखी कोडी आपल्या पाहण्याच्या क्षमतेची चाचणी तर घेतातच; परंतु आपल्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या प्रक्रियेलाही आव्हान देतात.

ऑप्टिकल इल्यूजनचे फायदे (Benefits of Optical Illusion)

ऑप्टिकल इल्युजन आणि ब्रेनटीझर्समध्ये गुंतणं हा वेळ घालवण्याचा केवळ एक मनोरंजक मार्ग नाही; तर ही बाब तुमच्या संज्ञानात्मक आरोग्यासाठीही (cognitive health) आश्चर्यकारकपणे फायदेशीर आहे.

१. ऑप्टिकल इल्युजन तुमच्या मेंदूला नवीन आणि वेगळ्या पद्धतीनं विचार करण्याचं आव्हान देतात; ज्यामुळे बौद्धिक क्षमता वाढते. तुमचं मन व दृष्टी व्यवस्थित एकाग्र करण्याच्या दृष्टीनं या प्रकारची उत्तेजना महत्त्वाची आहे.ं
२. यासारख्या कोड्यांवर नियमितपणे काम केल्याने तुमची विश्लेषणात्मक विचारसरणी आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. या आव्हानांमध्ये तुम्ही जितके जास्त व्यग्र राहाल, तितके तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातील समस्यांना तोंड देण्यास अधिक सक्षम व्हाल.

हेही वाचा… Optical Illusion: चला बघूया! ‘या’ चार चित्रांमधील कोडी सोडवण्यात किती घेताय वेळ? मेंदूवर जरा द्या जोर आणि लावा उत्तरांचा शोध

३. बऱ्याच ऑप्टिकल इल्युजन आणि ब्रेनटीझर्ससाठी तुम्हाला विशिष्ट तपशील किंवा नमुने आठवण्याची आवश्यकता असते; जे कालांतरानं तुमची स्मरणशक्ती मजबूत करण्यास मदत करू शकतात.

४. हे कोडं तुम्हाला चौकटीबाहेर विचार करण्यास प्रोत्साहित करतं. कोड्यात काय दडलं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करताना, तुम्ही तुमची सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण विचार प्रक्रियांना चालना देत असता.

५. हे इल्युजन सोडविण्यासाठी एकाग्रता आवश्यक असते. या सुधारलेल्या फोकसमुळे तुमच्या जीवनातील इतर क्षेत्रांमध्ये याचा परिणाम तुम्हाला दिसू शकतो.

६. यावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका; परंतु अशी कोडी सोडवणं खरंच खूप रिलॅक्सिंग वाटू शकतं.

तुम्हाला या कोड्याचं उत्तर सापडलं का?

जर तुम्हाला सात सेकंदांत नंबर दिसला असेल, तर तुमच्याकडे तीक्ष्ण नजर आणि चांगली बौद्धिक क्षमता आहे. जर हे कोडं तुम्ही सोडवू शकला नाहीत, तर काळजी करू नका. वर्तुळावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करा. तुम्ही बारकाईनं पाहिल्यास तुम्हाला एक अस्पष्ट, जवळजवळ चमकणारा पांढरा आकार दिसू लागेल.

उत्तर- ही लपलेली संख्या ८९ आहे.