optical illusion: ऑप्टिकल इल्यूनज हे आपल्या मनाला फसवणारी आणि चकित करणारी एक यूक्ती असते. ऑप्टीकल इल्यूजन पाहून बऱ्याचदा आपल्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असे विविध ऑप्टिकल इल्यूजन तयार करणे ही देखील आगळी वेगळी कला आहे जी साकरणे प्रत्येकाला शक्य नसते. सध्या ट्विटरवर व्हिडिओ चर्चेत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती फरशीच्या टाईल्स वापरून आकर्षक ऑप्टिकल इल्यूनज तयार करत आहे. सध्या हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रत्येकाला थक्क करत असून लोकांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘या’ देशात राहण्यासाठी तुम्हाला मिळतील ७१ लाख रुपये, फक्त ही अट करावी लागेल पूर्ण

या व्हिडिओ क्लिपमध्ये, एक माणूस बारकाईने विशिष्ट आकारात टाइल्स कापताना दिसत आहे आणि नंतर अत्यंत कुशलतेने तो ते सर्व एकत्र करताना दिसतो. सुरुवातीला, तो व्यक्ती काय करतोय हे समजत नाही त्यामुळे तुमचा गोंधळ होऊ शकतो. पण, काही सेकंदातच, जमिनीवर एक मनमोहक फोटो तयार होतो. ट्विटर @Rainmaker1973 या अकांऊटवरून हा व्हिडिओ पोस्ट केलेला असून कॅप्शनमध्ये, “हा टाइलर टाइलसह एक चमकदार ऑप्टिकल इल्यूजन निर्माण करतो.” असे लिहिले आहे.

हेही वाचा – टेंशनमध्ये आहे हा देश! ११ वर्षांची मुलं सुद्धा डायपर घालून शाळेत येतात, म्हणे, ”टॉयलेट कसे…”

या व्हिडिओला तब्बल १.५ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. या ऑप्टिकल इल्यूजनने मोहित झालेल्या १४ लाखांपेक्षा जास्त कमेंट शेअर केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले, “हे मी पाहिलेले सर्वात सुंदर काम आहे.” दुसर्‍याने म्हटले, “अरे, मला हा कॉन्टेंट आवडतो.” तिसऱ्याने सांगितले की, “मला फक्त हे इल्यूजन आवडतात. हे बुद्धीला आव्हान देतात.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion created using cleverly arranged tiles captivates netizens watch video snk
Show comments