ऑप्टीकल इल्यूजनचे अनेक फोटो आश्चर्यचकीत करणारे असतात. फोटोमध्ये कधी जसे दिसते तसे नसते तर कधी अनेक गोष्टी दडलेल्या असतात. कधी कधी काही गोष्टी समोर असतात तरीही आपल्या डोळ्यांना दिसत नाही. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जंगलातील दृश्य दाखवले आहे. झाडे, पाने-फुले जमीनीवर पडलेली दिसत आहेत पण तुम्हाला माहिती आहे का, या फोटोमध्ये एक मॉडेलसुद्धा आहे.
सोशल मीडियावर असे ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. काही इल्यूजनचे फोटो इतके क्लिष्ट असतात की उत्तर शोधणे, कठीण जाते.
@Datoism या ट्विटर अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. अनेक युजर्सला या फोटोमध्ये कोणी मॉडेल दिसली नाही तर काही युजर्सनी या फोटोमध्ये एक मॉडेल दिसल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा: Optical Illusion : फोटोमधील कोणता आकडा आहे गायब? वाटतं तितकं सोपं नाही, एकदा क्लिक करून पाहाच
फोटोमध्ये खरंच मॉडेल आहे का?
हा फोटो जंगलातील फोटो दिसत आहे. या फोटोमध्ये एक लोखंडी दरवाजा दिसत आहे आणि आजूबाजूला पाने, फुले पडलेली आहेत. झाडे-झुडपेही फोटोमध्ये दिसत आहेत. जेव्हा तुम्ही या फोटोचे बारीक निरीक्षण कराल तेव्हा तुम्हाला एका झाडाच्या खोडाजवळ एक मॉडेल पाय पसरून बसलेली दिसेल.
हे ऑप्टिकल इल्यूजन जितके सोपे दिसते, तितके कठीण आहे. मॉडेलने खोडाच्या आणि पाने फुलांच्या रंगाची तिच्या शरीरावर पेंटिंग केली आहे. त्यामुळे तिला ओळखणे अवघड जाते. सध्या हे ऑप्टिकल इल्यूजन सोशल मीडियावर चर्चेत आहे.