Optical Illusion : सोशल मीडियावर आपली बौद्धिक क्षमता तपासणाऱ्या अनेक गोष्टी व्हायरल होतात. कधी नेटकऱ्यांना गणिताचा एखादा प्रश्न विचारला जातो कधी ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो किंवा व्हिडीओ द्वारे नेटकऱ्यांची बौद्धिक क्षमता तपासली जाते. ऑप्टिकल इल्यूजन ही एक प्रकारची बौद्धिक चाचणी असते. अनेक लोकांना ऑप्टिकल इल्यूजन सोडविणे खूप आवडते. काही ऑप्टिकल इल्यूजन सोपी असतात तर काही ऑप्टिकल इल्यूजन कठीण असतात.
सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फोनमधील एका माणसाचे चित्र दाखवते आणि त्या चित्रामध्ये कुत्रा दिसतोय का हे विचारते? पण त्या व्यक्तीला कुत्रा दिसत नाही आणि ती व्यक्ती “नाही” म्हणते. आज आपण त्या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोविषयी जाणून घेणार आहोत. (optical illusion do you see a dog or a man just click and check video goes viral)

ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion)

या व्हिडीओमध्ये तुम्हाला माणसाचे चित्र दिसेल. तुम्हाला या माणसाच्या चित्रामध्ये कुत्र्याचे चित्र दिसत आहे का? खरंच या फोटोमध्ये दाखवलेल्या माणसाच्या चित्रात कुत्र्याचे चित्र दडलेले आहे का? त्यासाठी तुम्हाला खालील व्हिडीओ नीट पाहावा लागेल.

हेही वाचा : VIDEO: आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? जंगलात फिरताना अचानक आला वाघ; पाहा पठ्ठ्यानं कसं डोकं लावून वाचवले प्राण

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

खरंच चित्रामध्ये कुत्रा दिसतो का? (do you see a dog)

या व्हिडीओमध्ये दाखवलेल्या चित्रामध्ये एका माणसाचे चित्र दिसत आहे पण हे चित्र नीट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जर हे चित्र उलटे करून पाहिले तर कदाचित दिसू शकतो. जेव्हा आपण चित्र उलटे करतो तेव्हा आपल्याला एक छोटा कुत्रा दिसतो, जो हातात बोन्स (हाडे) घेऊन बसलेला दिसत आहे. हे चित्र पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : VIDEO : मराठी माणसाची गळचेपी थांबणार तरी कधी? मराठी बोलल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने नाकारले तिकीट; तुम्हीच सांगा यात चूक कुणाची?

rajkandaofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कुत्रा शोधून दाखवा..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “उलट करून पाहा” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सोपी आहे.. फोन उलटा केला की लगेच दिसेल.” अनेक युजर्सनी या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहेत.