Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन हा बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ आहे. यावरुन तुम्ही एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन ओळखू शकता.तुम्ही समोर बघितलेली एखादी गोष्टी कशी आत्मसात करता, हे यावर अवलंबून आहे.सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत असतात. काही इल्यूजन इतके कठीण असतात की सोडविणे अशक्य होते. अनेक लोकांना ऑप्टिकल इल्यूजन सोडविणे, आवडतात.
सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो व्हायरल होत आहे. निळ्या रंगाने भरलेला हा प्लेन फोटो आहे. यावर तुम्हाला काहीही दिसणार नाही. पण या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये असे सांगितले आहे की या प्लेन फोटोवर काही आकडे लपलेले आहेत आणि ते आपल्याला शोधायचे आहे.खरंच या फोटोमध्ये आकडे लपलेले आहेत का?

व्हायरल फोटो

हा व्हायरल फोटो खूप साधा आहे. निळ्या रंगाचा हा फोटो आहे. फोटोवर काहीही दिसत नाही. आकडा किंवा एखादी कलाकृती सुद्धा काढलेली दिसत नाही. हा फोटो पाहून तुम्हाला वाटेल की यात काय विशेष आहे. फोटो तुम्हाला वाटेल की खरंच या फोटोमध्ये आकडे लपलेले आहेत का? या व्हायरल फोटोची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
7 year old boy drew a picture of Dhananjay Powar on his hand
७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा : “बंदा डरता सिर्फ बापू की मार से..” चिमुकल्याचा मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल, एकदा पाहाच

या फोटोमध्ये आकडे लपलेले आहेत का?

हा व्हायरल फोटो खूप साधा आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की निळ्या रंगाचा प्लेन फोटो आहे. त्यावर काहीही लिहिलेले किंवा कोणती आकृती काढलेली नाही पण जेव्हा तुम्ही नीट लक्ष देऊन पाहाल तेव्हा तुम्हाला थोडे थोडे आकडे दिसू शकते. जेव्हा तुम्ही एक डोळा बंद करुन पाहाल तेव्हा तुम्हाला स्पष्टपणे हे आकडे दिसू शकतात. हा फोटो पाहून तुम्हीही अचंबित व्हाल. सध्या हा थक्क करणारा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये तुम्हाला चार अंकी आकडा दिसेल. फोटो नीट पाहिल्यावर तुम्हाला ‘3313’ हे आकडे दिसू शकतात. हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो जितका दिसतो तितका सोपी नाही. त्यासाठी दूरदृष्टी लागते.