Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन हा बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ आहे. सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या ट्विटरवर असाच एक ऑप्टिकल इल्युजनचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक अथांग समुद्र दिसत आहे आणि या समुद्राच्या वर एक नाव हवेत उडताना दिसत आहे.
हा व्हिडीओ पाहल्यानंतर कुणालाही प्रश्न पडू शकतो की, हे कसं शक्य आहे? नाव हवेत कशी उडणार? ऑप्टिकल इल्युजनचा हा व्हिडीओ संभ्रमित करणारा आहे; पण खरंच नाव हवेत उडत आहे का? चला तर जाणून घेऊ या नेमके काय आहे ते?
हेही वाचा : Video : मुसळधार पावसात घराबाहेर निघाला तरुण अन् अचानक वीज कोसळली; पाहा धक्कादायक व्हिडीओ
व्हिडीओमध्ये काय दिसत आहे?
या व्हायरल ऑप्टिकल इल्युजनच्या व्हिडीओमध्ये समुद्र आणि दूरवर असलेली नाव दिसत आहे; पण नाव समुद्राच्या पाण्यात तरंगताना दिसण्याऐवजी हवेत उडताना दिसतेय. @Rainmaker1973 या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा : Video : मुसळधार पावसात घराबाहेर निघाला तरुण अन् अचानक वीज कोसळली; पाहा धक्कादायक व्हिडीओ
खरंच नाव हवेत उडत आहे का?
याचे उत्तर @Rainmaker1973 या युजरनेच त्याच्या कॅप्शनमध्ये दिले आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नावेच्या आजूबाजूला पसरलेल्या धुक्यामुळे ती नाव समुद्राच्या पाण्यात तरंगताना दिसत नाही आणि त्यामुळे दुरून ती नाव हवेत उडत असल्याचा भास होतो.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “आपला मेंदू फार निकामी झाला आहे आणि याचा फायदा ऑप्टिकल इल्युजन घेतात.” तर एका युजरने लिहिले, “हा ऑप्टिकल इल्युजनचा व्हिडीओ खरंच खूप आकर्षित करणारा होता. हा व्हिडीओ पाहून अनेक जण संभ्रमित होऊ शकतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच अप्रतिम! निसर्ग आपल्या डोळ्यांबरोबर अनेकदा खेळत असतो”