Optical illusion : ऑप्टिकल इल्यूजन ही बौद्धिक क्षमता जाणून घेणारी चाचणी असते. काही ऑप्टिकल इल्यूजन इतके कठीण असतात की सोडवणे अशक्य होतात. सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनच्या अशा अनेक फोटो व्हायरल होत असतात, ज्यामध्ये लपलेल्या गोष्टी शोधाव्या लागतात.
सध्या असाच एक जंगलातील फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक मांजर लपलेली आहे, असं म्हणतात. सध्या हे ऑप्टिकल इल्यूजन सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.
व्हायरल फोटो हा एखाद्या जंगलातील असल्याचा दिसत आहे. या फोटोमध्ये झाडाच्या फांद्या आणि पाने आणि पानांचा कचरा पडलेला दिसत आहे.
Mohonk Preserve या फेसबुक अकाउंटवरून हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “तुम्हाला मांजर दिसली का?” अनेक यूजर्सनी कोणतीही मांजर न दिसल्याचे लिहिले आहे तर काही यूजर्सनी मांजर दिसल्याचे लिहिले आहे.
हेही वाचा : “टाळ-मृदंगाचा ध्वनी अश्व दौडले रिंगणी…” संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचा व्हिडीओ व्हायरल
खरंच फोटोमध्ये मांजर आहे का?
हो, फोटोमध्ये मांजर आहे. आम्ही एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मांजर कुठे आहे, हे दाखवले आहे. झाडांच्या फांद्या, पाने, आणि सर्वत्र कचरा असल्यामुळे मांजर लगेच दिसून येत नाही पण बारीक निरीक्षण केल्यास मांजर तुम्हाला दिसून येते.