Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्युजन हा बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ आहे. काही ऑप्टिकल इल्युजन्स खूप कठीण असतात; तरीही अनेक लोकांना इल्युजन सोडवायला आवडते.
सध्या असेच एक ऑप्टिकल इल्युजनचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रामध्ये कोल्हा दिसत आहे; पण यात मांजरसुद्धा लपलेली आहे. सध्या हे चित्र सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.
तुम्हाला या चित्रामध्ये मांजर दिसत आहे का? या चित्राकडे तुम्ही नीट पाहाल, तर तुम्हाला एका झाडाखाली कोल्हा उभा असलेला दिसेल. त्याच्या आजूबाजूला सुकलेल्या झाडाचे खोड दिसत आहे. झाडाच्या फांद्यासुद्धा सुकलेल्या दिसत आहेत; पण या चित्रामध्ये मांजर कुठेही दिसत नाही.
हेही वाचा : हा कोणता डान्स प्रकार आहे? लहान मुलाचे हावभाव अन् ‘या’ अतरंगी स्टेप्स इंटरनेटवर घालतायेत धुमाकूळ
PooPb0i56 या अकाउंटवरून रेडिटवर या चित्राचा फोटो शेअर करण्यात आला आहे आणि या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्ही मांजर शोधू शकता का?” या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अनेक युजर्स फोटो पाहून गोंधळले. काही युजर्सना कोणतीही मांजर या फोटोमध्ये दिसली नाही; तर काही युजर्स म्हणतात की, त्यांना या फोटोमध्ये मांजर दिसली.
एका युजरने लिहिलेय, “या फोटोमध्ये एक मांजर आहे; पण ती शोधणं खरंच खूप कठीण आहे; पण मला मांजर दिसली.” तर एका युजरनं लिहिलेय, “हे आजवरचे सर्वांत कठीण ऑप्टिकल इल्युजन आहे”
खरंच चित्रामध्ये मांजर आहे का?
या चित्रात सुरुवातीला तुम्हाला कोल्हाच दिसतो; पण जेव्हा तुम्ही हे चित्र खूप बारकाईने पाहता तेव्हा तुम्हाला सुकलेल्या झाडाच्या फांद्या दिसतील. या फांद्यांच्या आकारांचे नीट निरीक्षण केले, तर तुम्हाला मांजर दिसेल. हे ऑप्टिकल इल्युजन इतके सोपे नाही.