Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन हा व्यक्तीची बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ आहे. सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत असतात. अनेक लोकांना इल्यूजन सोडवायला आवडते. काही इल्यूजन इतके कठीण असतात की सोडवणे अशक्य असते. सध्या सोशल मीडियावर सुद्धा ऑप्टिकल इल्यूजनच्या अनेक फोटो दिसून येतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये काळ्या पांढऱ्या रेषा दिसत आहे पण यात एक प्राणी लपलेला आहे, असा दावा केला जात आहे. तो प्राणी आपल्याला शोधून काढायचा आहे. तुम्हाला वाटेल या फोटोमध्ये फक्त काळ्या पांढऱ्या रेषा दिसताहेत मग फोटोमध्ये खरंच प्राणी आहे का? त्यासाठी तुम्हाला व्हायरल फोटो पाहावा लागेल आणि नीट तपासून पाहावे लागेल.
व्हायरल फोटो
या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बारीक रेषा दिसेल. या रेषा अत्यंत बारीक आहे. तुम्ही खूप जास्त वेळ या रेषांकडे बघू शकत नाही. या व्हायरल फोटोमध्ये एक प्राणी दिसत असल्याचा दावा केला जात आहे. खरंच या फोटोमध्ये एखादा प्राणी तुम्हाला दिसत आहे का?
या फोटोमध्ये प्राणी तुम्हाला दिसत आहे का?
सुरुवातीला तुम्ही हा फोटो पाहाल तर तुम्हाला या फोटोमध्ये केवळ काळ्या आणि पांढऱ्या आडव्या रेषा दिसतील पण जेव्हा तुम्ही बारकाईने पाहाल तर तु्म्हाला कदाचित एक प्राणी दिसू शकतो. त्यासाठी तुम्हाला फोटोला एका बाजूने नीट पाहावे लागेल. तुम्हाला या चित्रामध्ये एक बेडूक दिसून येईल. काही लोकांना लगेच दिसेल तर काही लोकांना दिसायला वेळ लागू शकतो. हा व्हायरल ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो पाहून कोणीही अवाक् होईल.
सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओवर अनेक युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. हे ऑप्टिकल इल्यूजन दिसायला जरी सोपी वाटत असले तरी सोडवायला कठीण आहे. फक्त ३० टक्के लोकांनाच या फोटोमध्ये प्राणी दिसला असेल.